वाडा येथे एसटीचा अपघात, ५० विद्यार्थी जखमी

वाडा येथे एसटीला भीषण अपघात. अपघातात ५२ प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.  

Updated: Aug 13, 2019, 11:45 AM IST
वाडा येथे एसटीचा अपघात, ५० विद्यार्थी जखमी title=

पालघर : वाडा येथे एसटीला भीषण अपघात झाला. या अपघातात ५२ प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एसटी प्रशासनाने एक हजार रूपयांची तातडीची मदत दिली आहे. 

वाडा आगाराची वाडा-पिवळी एसटी आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पिवळीहून वाड्याकडे येत असताना हा अपघात झाला. जांभुळपाडा येथे असलेल्या गतिरोधकावर चालक काशिनाथ जाधव याने जोराचा ब्रेक लावल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटून सुटला आणि एसटी थेट शेतात घुसली. या अपघातातत एसटीतील ५० विध्यार्थी जखमी झालेत. त्यांच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातातील दोघांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना ठाणे येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर उर्वरितांवर वाडा येथील ग्रामीण आणि खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये बहुसंख्य शालेय विद्यार्थी आहेत. रामनवमी प्रसाद (५०) सुमन प्रसाद (४५) यांच्या हात आणि पायाला फॅक्चर झाले आहे. त्यांना ठाणे येथे हलविण्यात आले आहे.