२४ तास. कॉम इम्पॅक्ट । गर्दी झालेल्या ठिकाणी कडकडीत बंद

 लॉकडाऊनचा नियम धाब्यात बसवून पनवेल येथील मिरची गल्लीत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. 

Updated: Apr 29, 2020, 02:49 PM IST
२४ तास. कॉम इम्पॅक्ट । गर्दी झालेल्या ठिकाणी कडकडीत बंद title=

मुंबई : कोरोचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आले. मात्र, लॉकडाऊनचा नियम धाब्यात बसवून पनवेल येथील मिरची गल्लीत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. याचे वृत्त २४ तास डॉट कॉमवर प्रसिद्ध केल्यानंतर त्याठिकाणी तात्काळ पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या ठिकाणी दुसऱ्या दिवशीही दुकाने बंद होती.

रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे मिरची गल्लीत सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम अक्षरश: पायदळी तुडवण्यात आले होते. पनवेल मिरची गल्लीत खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत होती. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त करण्यात येत होती. तसेच पनवेलमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. आतापर्यंत ५६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, या आवाहनाकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.

 पनवेल येथे खरेदीसाठी मोठी गर्दी, नियम धाब्यावर

 

पनवेल येथे खरेदीसाठी मोठी गर्दी, नियम धाब्यावर

रायगडमधील एका ६० वर्षीय महिलेचे आज मुंबईतील निधन झाले. ती कोरोना पॉझिटिव्ह होती. तसेच याआधी पनवेलमध्ये कोरोना बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना रुग्णांची वाढ होत असताना मिरची गल्लीत खरेदीसाठी गर्दी दिसून येत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत होती. सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम अक्षरश: पायदळी तुडवण्यात आल्याचे दिसून येत होते, याबाबत २४ तास डॉट कॉमने वृत्त प्रसिद्ध केले. याची तात्काळ दखल प्रशासनाला घ्यावी लागली.

 दरम्यान, रायगड जिल्ह्यात कोरोनाचे दोन दिवसांपूर्वी सात नवे रुग्ण आढळून आले होते. तर पनवेल महापालिका क्षेत्रात सहा रुग्ण आढळले होते. खालापूर तालुक्यात एक नवीन रुग्ण सापडला होता. खालापूरमध्ये एकही रुग्ण नव्हता. मात्र, आता खालापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव पाहायला मिळत आहे. तर खोपोलीतील ६३ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण  झाली आहे. रायगड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७७वर पोहोचली आहे.