पुण्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच, दोघांना अटक

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक खासगी इसम आणि तथाकथित प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. पुणे एसीबीच्या टीमने ही कारवाई केली आहे. 

Updated: Jul 20, 2017, 08:46 PM IST
पुण्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच, दोघांना अटक title=

पुणे : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक खासगी इसम आणि तथाकथित प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. पुणे एसीबीच्या टीमने ही कारवाई केली आहे. 

विठ्ठल सांळुखे आणि अविनाश कांबळे अशी या दोघांची नावं आहेत. अनुत्तीर्ण झालेल्या विषयात उत्तीर्ण करून देतो असं सांगत सांळुखेनं एका विद्यार्थाकडे लाचेची मागणी केली होती. दोन विषयांसाठी साठ हजार रुपयांची मागणी सांळुखेनं केली होती. 

तडजोडीत चाळीस हजार रुपये रक्कम ठरवली. यातील वीस हजार रुपये घेताना सांळुखेला एसीबीनं रंगेहाथ अटक केली. लाच स्वीकारताना सांळुखेनं विद्यार्थ्याचे प्राध्यापकासोबत फोनवर बोलणं करून दिले .मात्र, तपासणी अंती तो पुणे विद्यापीठातील प्राध्यापक नसून तो साळुंखेचा सहकारी असल्याचे समजते.