जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे उघडले, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी धरणाच्या इतिहासात गेले शंभर दिवस धरणात शंभर टक्के पाणीसाठा...

Updated: Oct 26, 2019, 04:09 PM IST
जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे उघडले, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा title=
संग्रहित फोटो

पैठण : औरंगाबादच्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आज सकाळी तब्बल १६ दरवाजे ३ फुटांनी उघडण्यात आले आहेत. त्यातून ५१ हजार ८९३ क्युसेक इतक्या वेगाने गोदापात्रात पाणी झेपावत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

गेल्या दोन महिन्यात दरवाजे उघडण्याची ही पाचवी वेळ आहे. महत्वाचं म्हणजे जायकवाडी धरणाच्या इतिहासात गेले शंभर दिवस धरणात शंभर टक्के पाणीसाठा असल्याची नोंद झाली आहे. 

सततच्या पावसाने जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक सुरर आहे. त्यामुळे हे दरवाजे पुढचे काही दिवस सुरू राहणार आहेत. जायकवाडीच्या या पाण्याने अर्ध्या मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यात अजूनही काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तर दुसरीकडे मराठवाड्याच्या अनेक भागात संततधार पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. 

  

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यास सुद्धा सुरुवात झाली. मात्र या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि रब्बी पिकासाठी पाण्याचा प्रश्न सुटला आहे.