मुंबईतून आंबेगावात आलेले १५ जण कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना रुग्ण अचानक वाढल्याने खळबळ

Updated: May 29, 2020, 08:29 PM IST
मुंबईतून आंबेगावात आलेले १५ जण कोरोना पॉझिटिव्ह title=

हेमंत चापुडे, पुणे : गेली दोन महिने ग्रीन झोनमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याची अखेर मुंबईकरांनी झोप उडवली आहे. आज एकाच दिवसात तब्बल पंधरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून हे सर्व रुग्ण मुंबई वरून आलेले आहेत. आज आलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये वडगाव काशिंबे येथील एकाच कुटुंबातील ७ जण पॉझिटिव्ह आले आहेत तर फदालेवाडी येथील ३, पेठ येथील २, शिनोली येथील एक, घोडेगाव येथील एक आणि एकलहरे येथील एक असे एकाच दिवसात तब्बल पंधरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

एकाच दिवसात १५ कोरोना रुग्ण आढळल्याने आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता २४ वर पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाने हा सर्व भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करत परिसर सील केला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहनही प्रशासनाकडून आता करण्यात आले आहे.