रत्नागिरी : चिपळूणध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित केलेल्या संभाजी भिडेंच्या सभेमुळे तणाव निर्माण झालाय. रत्नागिरीतल्या तब्बल १४ सामाजिक संस्थांनी या सभेला कडाडून विरोध केला. सभेच्या ठिकाणी या सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संभाजी भिडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या सभेत संभाजी भिडे '३२ मण सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापना व खडा पाहारा योजना' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आता या बैठकीला विरोध होत असल्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय. संभाजी भिडेंच्या बैठकीला चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.