SSC-HSC Board Exam 2023 : दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट, Examला उशीरा झाला तर...

SSC-HSC Board Exam 2023 : यंदाची बारावीची परीक्षा (HSC Exam) 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा (SSC Exam) 2 ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. याचदरम्यान दहावी-बारावीच्या परिक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. 

Updated: Jun 2, 2023, 09:28 AM IST
SSC-HSC Board Exam 2023 : दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट, Examला उशीरा झाला तर... title=
ssc hsc exam important update for students

SSC-HSC Board Exam 2023 Update : येत्या 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा तर दहावीची परीक्षा (HSC-SSC Board Exam Dates) 2 ते 25 मार्चदरम्यान परिक्षा होणार आहे. ज्यात औरंगाबाद विभागातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतून बारावीचे 1 लाख 78 हजार 499 विद्यार्थी तर दहावीची परीक्षेसाठी 1 लाख 66 हजार 964 विद्यार्थी परीक्षा देणार आहे. मात्र याचदरम्यान परिक्षेबाबत मंडळाकडून महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. 

दरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रावर हजर राहायचं आहे. जर परीक्षेला पोहोचायला उशिर झाला तर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, अशी सूचना परीक्षा मंडळाकडून दिली.  परीक्षा मंडळाच्या मते, उशिरा पोहचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचे बोर्डाच्या निरर्शनास आले आहे. त्यानंतर बोर्डाकडून अशी सूचना जारी करण्यात आली. 

वाचा: विक्रमी खेळीनंतर शुभमन गिल Emotional, पोस्ट करत म्हणाला...  

यंदाची दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा येत्या 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता अशी पेपरची वेळ आहे. मात्र आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत 10 मिनिटे उशीरा झाला असला तरी, विद्यार्थ्यांना पेपरला परवानगी देण्यात येत होती. मात्र आता राज्य मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत. परीक्षे केंद्रावर आता विद्यार्थ्यांनी सकाळी 10.30 वाजता तर दुपारी 2.30 वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या संदर्भातील पत्र देखील मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे.