मान्सूनपूर्व पावसानं केळी बागायतदारांचं 100 कोटीचं नुकसान

मान्सूनपूर्व पावासाचा तडाखा

Updated: Jun 2, 2018, 06:59 PM IST
मान्सूनपूर्व पावसानं केळी बागायतदारांचं 100 कोटीचं नुकसान title=

जळगाव : मान्सूनपूर्व पावसानं राज्यातील अनेक ठिकाणच्या पिकांचं चांगलच नुकसान केलय. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्याला तर या पावसानं चांगलंच झोडपून काढलं. वादळी वाऱ्यासह दाखल झालेल्या पावसानं केळी बागायतदारांचं थोडथोडकं नव्हे तर तब्बल शंभर कोटी रुपयांचं नुकसान झालय. यामुळे इथंला शेतकरी हवालदिल झाला आहे.

मान्सूनपूर्व पावासाने मालेगाव तालुक्यातील गावांना चांगलाच तडाखा दिला. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह  बरसलेल्या पावसाने देवळा तालुक्यातील मेशी, वासोळ, महालपाटणे, देवपूरपाडा परिसरात अनेक वृक्ष कोलमडून पडली तर विजेच्या तारा तुटल्याने वीजही गायब झाली. अनेक घरांचे, पोल्ट्री फॉर्म आणि कांदा चाळींचे पत्रे उडाले. घरांची कौलं आणि गुरांचे शेडही उडाले. 

अचानक बरसलेल्या पावसामुळे उघड्यावर पडलेला शेतमाल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. डाळींब बागांचं आतोनात नुकसान झालं. कांदा ओला झाला तर आंब्याचे देखील नुकसान झाले. तसेच मालेगाव तालुक्यातील सवंदगावमध्येही वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने  गोठ्याजवळील विद्युत खांब कोसळला. त्याखाली सापडून एक म्हैस आणि पाच शेळ्या ठार झाल्या. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना  दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. 

बातमीचा व्हिडिओ