Good News for Teaching staff : शिक्षणसेवकांसाठी मोठी खुशखबर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Good News for Teaching staff : शिक्षणसेवकांसाठी मोठी खुशखबर

7 Feb 2023, 11:55 वाजता

बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा

 

Balasaheb Thorat Resign : काँग्रेसमध्ये (Congress) मोठा राजकीय भूकंप झालाय. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले (Nana Patole) यांचा वाद विकोपाला गेल्याचं चित्रं आहे. त्यामुळे थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिल्याची माहिती आहे. खुद्द बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याची ‘झी २४ तास’ला EXCLUSIVE माहिती दिलीय. थोरातांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी अजून स्वीकारलेला नाही. थोरातांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण थोरात राजीनाम्यावर ठाम आहेत. काँग्रेसमधील वाद यामुळे चव्हाट्यावर आलाय. नाशिक पदवीधर निवडणुकीपासूनच थोरातांचं नाराजीनाट्य रंगलंय. सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी भरल्यानंतर थोरात सार्वजनिक कार्यक्रमात आले नव्हते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या भावना पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर थोरात राजीनामा देतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. थोरातांनी आता स्वतः राजीनामा देत नाना पटोलेंना शह दिल्याचं मानलं जातंय. सविस्तर बातमीसाठी इथं क्लिक करा

बातमी पाहा - मोठी बातमी! काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, बाळासाहेब थोरात यांचा पदत्याग

7 Feb 2023, 10:47 वाजता

तुर्कस्तानात भूकंपामुळं हाहाकार, आतापर्यंत 4,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू

 

Turkey Earthquake Update : भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी तुर्कस्तान हादरलंय.. तुर्कस्तानात 24 तासात 3 प्रलयंकारी भूकंप झालेत.. या भूकंपाची तिव्रता 7.8, 7.6 आणि 6 रिस्टर स्केल एवढी होती.. भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मोठी जीवित हानी झालीये. तुर्कस्तानात 4 हजारांहून अधीक नागरीकांचा मृत्यू झालाय.. तर अनेक नागरीत अजूनही ढिगा-याखाली अडकले आहेत. तुर्कस्तानात मदतकार्य वेगानं सुरु आहे.. भारताचं NDRFचं पथकही मदतीसाठी तुर्कस्तानला रवाना झालंय..  भूकंपानंतर तुर्कस्तानमध्ये 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय.

बातमी पाहा - तुर्की- सीरियात भूकंपाचे 4000 हून अधिक बळी; आता आणखी एक संकट समोर उभं

7 Feb 2023, 10:23 वाजता

हायवेसाठी चाकमान्यांची 'तप'श्चर्या

 

Mumbai Goa Highway : चाकरमान्यांना मुंबई-गोवा हायवेनं गावी जाण्यासाठी आणखी वर्षभर थांबावं लागणार आहे... मुंबई-गोवा हायवे चौपदरीकरणासाठी राज्य सरकारनं फेब्रुवारी 2024ची नवी तारीख दिलीय.. मात्र हायवेचं काम फक्त 69 टक्केच पूर्ण झाल्यानं राज्य सरकार ही नवी डेडलाईन तरी पाळणार का यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. जमीन संपादनातल्या अडचणी, वनखात्याच्या परवानगीला होणारा उशिर अशा विविध कारणांमुळे दिरंगाई होत असल्याचं कारण सरकारी अधिका-यांनी दिलंय..  सध्या हायवेचं काम अपूर्ण असल्यानं चाकरमानी मुंबई-कोल्हापूर-गगनबावडा मार्गे किंवा आंबोली मार्गे सिंधुदुर्गात जातोय.

बातमी पाहा - मुंबई गोवा हायवेच्या उद्घटनाची नवी तरीख समोर! ही तरी तारीख राज्य सरकार पाळणार का?

7 Feb 2023, 10:04 वाजता

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नाना काटेंना उमेदवारी

 

Chinchwad ByPoll Election : चिंचवडमधून नाना काटेंना (Nana Kate) उमेदवारी देण्यात आलीय. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच लढणार यावर कालच शिक्कामोर्तब झालं, पण काल राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला नव्हता. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्वीट करून नाना काटे यांची उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे आता चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) विरूद्ध राष्ट्रवादीचे नाना काटे असा सामना होणार आहे.

बातमी पाहा - राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी; नाना काटे लढणार पोटनिवडणूक

 

7 Feb 2023, 09:12 वाजता

'समृद्धी'नंतर 'शक्तीपीठ' महामार्ग बनणार

 

Shaktipeeth Mahamarg : नागपूरवरुन गोवा आता फक्त 11 तासांत गाठता येणार आहे... समृद्धी महामार्गानंतर आता राज्यात आणखी एक परिवहन क्रांती होणार आहे. समृद्धीनंतर आता राज्यातल्या सर्व शक्तिपीठांना जोडणारा 760 किलोमीटरचा सुपरफास्ट हायवे बांधण्यात येणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेला हा महामार्ग 13 जिल्ह्यांतून जाणार आहे. नागपूर ते गोवा हे अंतर सध्या 1 हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहेत.. त्यासाठी 22 तास लागतात.. मात्र नव्या शक्तिपीठ महामार्गाने हे अंतर कमी होणार असून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या मालाला पश्चिम महाराष्ट्र तसंच कोकणातली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

बातमी पाहा - 'समृद्धी' नंतर आता मिशन 'शक्तिपीठ'! कसा असणार हा ग्रीन फिल्ड सुपरफास्ट हायवे?

7 Feb 2023, 09:09 वाजता

मध्य रेल्वेवरील वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर निश्चित

 

Vande Bharat Train Ticket Rate : मध्य रेल्वेवरील वंदे भारत गाडीचे तिकीट दर निश्चित झालेत. 10 फेब्रुवारीला मुंबई ते सोलापूर (Mumbbai-Solapur) आणि मुंबई ते शिर्डी (Mumbai-Shirdi) या दोन वंदे भारत ट्रेनना पंतप्रधान मोदी (Prime Minster Narendra Modi) हिरवा झेंडा दाखवणार आहेत. वंदे भारत गाडीने मुंबईहून पुण्यात अवघ्या 3 तासांत तर सोलापूरपर्यंत साडेपाच तासांत पोहोचता येईल. तर मुंबई ते शिर्डी हे अंतर अवघ्या 6 तासांत पार करता येणार आहे. मात्र सध्या जाहीर झालेल्या तिकीट दरात खानपान सेवेचा समावेश नाही. खानपान सेवेचे दर अजूनही आयआरसीटीसीने जाहीर केले नाहीत. 

बातमी पाहा - वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर निश्चित! जाणून घ्या मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर किती असणार दर

7 Feb 2023, 08:15 वाजता

तुर्कस्तानात भूकंपामुळं हाहाकार, आतापर्यंत 3500हून अधिक नागरिकांचा मृत्यू

 

Turkey Earthquake Update : तुर्कस्तान (Turkey) भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरलंय.. तुर्कस्तानात 24 तासात 3 प्रलयंकारी भूकंप झालेत.. या भूकंपाची तीव्रता 7.9 रिश्टर स्केल एवढी होती.. भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये (Syria) मोठी जीवितहानी झालीये. तुर्कस्तानात 3 हजार 500हून अधिक (3,500 Death) नागरीकांचा मृत्यू झालाय.. तर अनेक नागरीत अजूनही ढिगा-याखाली अडकले आहेत. तुर्कस्तानात मदतकार्य वेगानं सुरु आहे.. भारताचं NDRFचं पथकही मदतीसाठी तुर्कस्तानला रवाना झालंय..  या भूकंपानंतर त्सुनामीचाही इशारा देण्यात आलाय.. भूकंपानंतर तुर्कस्तानमध्ये 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. सविस्तर बातमी पाहण्यासाठी इथं क्लिक करा

बातमी पाहा - तुर्की- सीरियात भूकंपाचे 3500 हून अधिक बळी; आता आणखी एक संकट समोर उभं

7 Feb 2023, 08:12 वाजता

मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय!

 

Mumbai Air Pollution : बातमी मुंबईतल्या प्रदूषणाची... यंदाच्या हिवाळ्यात मुंबईत गेल्या चार वर्षातल्या सर्वात जास्त प्रदूषणाची नोंद झाली.. गेल्या 4 वर्षांतली आकडेवारी पाहिली तर मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. 2019 ते 2022 मध्ये सरासरी 28 दिवस हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक ते अतिधोकादायक श्रेणीत होता.. मात्र मागच्या तीन महिन्यांत 66 दिवस हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक ते अतिधोकादायक श्रेणीत नोंदवला गेला... हवेची गुणवत्ता खालवत असल्यानं मुंबईकरांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. मुंबईत अनेक रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा समस्या वाढल्या आहेत. 

7 Feb 2023, 07:58 वाजता

बाळासाहेब थोरातांचं गटनेतेपद अडचणीत?

 

Balasaheb Thorat : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचं काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपद अडचणीत आल्याची चर्चा आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीतली निष्क्रियता आणि पटोलेंसोबतचा (Nana Patole) वाद या पार्श्वभूमीवर थोरातांवर कारवाई होणार अशी चर्चा जोरात आहे. कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीनंतर (Kasba, Chinchwad ByPoll Election) यावर निर्णय होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय. थोरात यांनी पटोलेंसोबत काम करणं अशक्य असल्याचं पत्र काँग्रेस अध्यक्षांना पाठवलं. या पत्रामुळे पटोले आणि थोरातांमधला वाद चव्हाट्यावर आला. काँग्रेसमधली गटबाजी यानंतर उघड झाली. पक्षाचे प्रभारी एच के पाटील (HK Patil) मुंबईत येऊन आढावा घेणार सूत्रांची माहिती आहे. तसंच पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक 13 फेब्रुवारीला होणार आणि ती वादळी होण्याची शक्यताय...थोरात आणि पटोले हे दोन्ही नेते राहुल गांधींचे निकटवर्तीय आहेत. तेव्हा काँग्रेस दोघांमध्ये समेट घडवणार की दोघांवर कारवाई करणार की दोघांपैकी एकावर कारवाई होणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचं लक्ष आहे. 

बातमी पाहा - मोठी बातमी ! बाळासाहेब थोरात यांचे गटनेतेपद जाणार? पटोले वादानंतर कारवाई होणार?