बाळासाठी नाव निवडताना कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतात, प्रल्हाद पै यांनी सांगितल्या खास टिप्स

नवजात बाळासाठी नाव ठेवताना पालक विशेष काळजी घेतात. अशावेळी पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 1, 2024, 03:18 PM IST
बाळासाठी नाव निवडताना कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतात, प्रल्हाद पै यांनी सांगितल्या खास टिप्स title=

घरी बाळाची चाहुल लागली की, सगळ्यांना वेध लागतात ते त्याच्या नावाचे. बाळासाठी नाव निवडताना पालक खूप प्रयत्न करतात. पालक अगदी संस्कृत किंवा वेद शास्त्र, पुराणातून खास नावांची निवड करतात. पण पालकांनी नाव निवडताना नक्की कशाचा विचार करायचा याबाबत जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद पै यांनी खास टिप्स दिली आहे. 

'नावात काय असतं, असं म्हटलं जातं. पण नावातच सगळ्या गोष्टी असल्याच प्रल्हाद पै सांगतात. बाळाच्या जन्मानंतर त्याच्यावर पहिला संस्कार होतो तो 'नामकरण' या विधीचा किंवा सोहळ्याचा. अशावेळी मुलावर पहिला संस्कार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण हा केलेला संस्कार आजीवन त्याच्यासोबत असतो. किंबहुना हेच नाव त्या व्यक्तीची ओळख बनून जाते. अशावेळी नाव निवडताना कायम पालकांनी सावध असणे आवश्यक आहे. 

नावातून संस्कार कसा घडतो? 

नाव हा मुलावर होणार पहिला संस्कार आहे. नाव निवडताना पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. अनेक पालकांना प्रश्न पडेल की, नावातून संस्कार कसा होतो. तर एखाद्या बाळाला नाव दिलं की, त्या नावाने त्याची ओळख होते. हे नाव सतत उच्चारल जातं. यामधून बाळावर एक संस्कार होत असतो. नाव उच्चारताना त्या व्यक्तीच्या मनातील भावना तेवढीच प्रसन्न आणि अर्थपूर्ण असते. 

नावाचा अर्थ किती महत्त्वाचा 

नाव ठेवताना त्या नावाचा अर्थ अतिशय महत्त्वाचा आहे. जसे की, आनंदी किंवा आनंद या नावातून त्या मुलावर संस्कार होतो आनंदी असण्याचा. तसेच हे नाव इतर व्यक्ती उच्चारत असेल तर त्याच्या उच्चारण्यातही तोच हेतू आणि भाव असतो. अशावेळी मुलावर कळत नकळत संस्कार होत असतो. मुलांसाठी नाव निवडताना पालकांनी याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. 

सकारात्मक मुलांची नावे आणि अर्थ 

आनंदी - आनंदी व्यक्ती 

आनंद - आनंदी जीवन जगणारे

यश - कायम यशाच्या शिखरावर असतो असा 

अयांश - यशचा अंश ज्यामध्ये आहे असा तो 

सुखदा - सुख कायम ज्या व्यक्तीकडे आहे अशी 

यशस्वी - यश कायम ज्या व्यक्तीकडे असते असा तो. 

उन्नती - ज्या मुलीची कायम उन्नती होईल अशी ती 

उत्कर्ष - जे मुलं कायम उत्कर्षाच्या शिखरावर असेल ते 

अथांग - अथांग समुद्रासारखा 

उन्मनी - मनाचे उन्मन होणारी स्थिती