सांध्यांमध्ये साचलेले युरिक अ‍ॅसिड खेचून बाहेर काढेल 'ही' हिरवी चटणी; वाचा सोपी रेसिपी!

Chutney For Uric Acid: हाडांमध्ये साचलेले युरिक अॅसिड खेचून बाहेर काढण्यासाठी हा घरगुती उपाय करुन पाहाच. हिरवी चटणी बनवण्याची रेसिपा पाहून घ्या.   

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 1, 2024, 01:55 PM IST
सांध्यांमध्ये साचलेले युरिक अ‍ॅसिड खेचून बाहेर काढेल 'ही' हिरवी चटणी; वाचा सोपी रेसिपी! title=
health tips in marathi Remedy for Uric Acid 4 Thing Mix Before Making Chutney

Chutney For Uric Acid: लंच किंवा डिनरमध्ये लोणचं आणि चटणी आवर्जुन खाल्ली जाते. भारतात विविध प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात. गोड चटणी ते तिखट चटणी सर्व प्रकारच्या चटण्या केल्या जातात. मात्र, तुम्हाला माहितीये का फक्त जेवणाची लज्जत वाढवण्याखेरीज आरोग्यासाठीही चटणी खूप उपयुक्त आहे. आज तुम्हाला एका चटणीची रेसिपी सांगत आहोत. ही चटणी खाल्ल्याने अनेक आजारांवर मात करता येते. तसंच, या चटणीमुळं युरिक अ‍ॅसिडच्या समस्येवरही मात करता येते. ही चटणी बनवण्यासाठी फक्त 4 पदार्थांची गरज आहे. ही चटणी कशी बनवायची जाणून घेऊया. 

युरिक अ‍ॅसिड म्हणजे काय?

युरिक अॅसिड आपल्या शरिरातील असा एक टाकाऊ पदार्थ आहे. जो शरीरामध्ये प्युरीन घटकांच्या चयापयानंतर युरिक अॅसिड टाकाऊ घटक म्हणून निर्माण केले जाते. निरोगी स्थितीत युरिक अॅसिड रक्तातील अतिरिक्त प्रमाणात तयार होते व त्याचे रक्तातील प्रमाण वाढू लागते. हे युरिक अॅसिड सांध्यांच्या ठिकाणी जमा होऊन सांध्यांमध्ये सूज, लालसरपणा व वेदना निर्माण करते. युरिक अॅसिड किडनीत साठून राहिलं तर किडनी स्टोनचा त्रास होतो. 

कशी बनवावी चटणी?

युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही चार पदार्थ मिक्स करुन चटणी तयार करु शकाल. ही चटणी बनवण्यासाठी तुम्हाला कोथिंबीर, पुदीना, हिरवी मिरची, आलं आणि मीठ याची गरज भासणार आहे. चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर आणि पुदीनाच्या पाने चांगली सुकवून घ्या. त्यानंतर यात आलं, हिरवी मिरची आणि पुदीना आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये टाकून चांगलं वाटून घ्या. आता तुमची चटणी तयार आहे. त्यात चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस टाकून मिश्रण चांगले एकजीव करा. तुम्ही ही चटणी चपाती, पराठे आणि भातासोबतही खावू शकता. 

लिंबातील व्हिटॅमीन सी, आलं आणि पुदिन्यातील अँटी ऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढून टाकायला मदत करतात. लसूण आणि आल्यात दाहक विरोधी गुणधर्म असतात. जे युरिक अ‍ॅसिडमुळं शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. या चटणीतील पदार्थ पाचनक्रिया मजबूत करतात आणि पोटही साफ होते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)