Diesel Paratha Viral Video: पराठा म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. नाश्तापासून ते अगदी दुपारच्या जेवणातही पराठा हवा असतो. पराठ्यांचेही वेगवेगळे प्रकार आहेत. आलु पराठा, मेथी पराठा, पालक पराठा, असे अनेक प्रकार चवीने खाल्ले जातात. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओपाहून तुम्हीही ढाब्यावर पराठा खाण्याआधी दहादा विचार कराल. पराठे बनवताना त्यात बटर किंवा तेलाचा वापर केला जातो. मात्र, या ढाबा मालकाने पराठ्यांमध्ये चक्क डिझेलचा वापर केला आहे. चंदीगढमधील ही घटना आहे. व्हायरल व्हिडिओमुळं अनेकजण आरोग्यासाठी हे किती हानिकारक आहे, यावर सवाल करत आहेत.
स्ट्रीट फुडच्या दर्जावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. अनेकदा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे उघड झाले आहे. असे अनेक प्रकरणही समोर आली आहेत. अलीकडेच चिकन शॉर्मा खाल्ल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. त्यातच आता सोशल मीडियावर डीझेल पराठ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 3 मिनिट 13 सेंकदाच्या या व्हिडिओत एक ढाब्याचा मालक तव्यावर डिझेल टाकून त्यात पराठा शेकत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर पराठा थोडा करपल्यानंतर तो ताटात काढून देत आहे.
हैराण करणारी गोष्ट म्हणजे, पराठा बनवणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, हा पराठा लोकांना खूप आवडतो. अनेकजण या पराठ्याची मागणी करतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. शेअर करण्यात आल्यानंतर काहीच वेळात हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्याला लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या ढाब्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Recipe for cancer.... Diesel paratha ... What do you think guys is it really Diesel?? pic.twitter.com/GCAAuQfoLe
— ankit (@pandeyankit197) May 12, 2024
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, पुढे काय होणार? हार्पिक पराठा. जेव्हा आयसीएमआर तुम्हाला व्हे प्रोटीन टाळण्याचा सल्ला देतात आणि एफएसएसएआय मसाल्यांमध्ये एथिलिन ऑक्साइटची असलेली मात्रा याची चिंता करत नाही. तेव्हा आपण काय म्हणू शकते. यात काहीच आश्चर्य नाहीये की भारत जगाची कर्करोगाची राजधानी आहे. तर एकाने व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, कर्करोगाची खरी रेसिपी.
सगळ्यात पहिले @nebula_world या एक्स हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पावलं उचलत ढाब्याविरोधात कारवाई केली आहे. त्यानंतर @nebula_worldने एक पोस्ट केली आहे. न्यायाच्या हितासाठी व्हिडिओ डिलीट करण्यात येत आहे.
There is an update that sufficient action has been taken based on this viral video
And it's prudent in the interest of justice, the original tweet is being taken down..https://t.co/KUPWs5qTUf pic.twitter.com/WJAX2rlt4c
— NebulaWorld (@nebula_world) May 14, 2024