Tirupati Balaji Temple Timing : आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात तिरुपति बालाजी हे मंदिर जगातील लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराशी संबंधित अनेक गोष्टी आहेत ज्या अतिशय चमत्कारीक आहेत. तिरुपती मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय मंदिर म्हणून ओळखलं जातं. व्यंकटेश्वर स्वामी या मंदिरातील प्रमुख देव असून भगवान विष्णुचे अवतार आहे. तिरुपती बालाजी मंदिराला भेट देण्याची इच्छा असेल तर जाण्यापूर्वी बुकिंग प्रोसेस ते दर्शनापर्यंतच्या वेळा सगळ्या गोष्टी जाणून घ्या.
तिरुपती बालाजी मंदिर ब्रम्होत्सव सारख्या विशेष कार्यक्रमसोडून संपूर्ण वर्ष दर्शनासाठी खुले असते. वेळ वेगवेगळी असू शकते. सामान्यपणे पहाटे 3 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 2.30 ते 9.30 पर्यंतचा वेळ दर्शनासाठी आहे. शुक्रवार आणि शनिवार मंदिर 24 तास खुले राहिल. मंदिरातील आतिल महत्त्वाच्या नियमांमुळे अनेकदा वेळेत बदल होतो.
तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी पैसे आकारले जातात. हे पैसे दर्शनाच्या प्रकारावर अवलंबून असते. रिपोर्टनुसार, सामान्य तिकिट 50 रुपयांची आहे.
तिरुपती बालाजी मंदिर इतर मंदिरांच्या तुलनेत लोकप्रिय आहे. मंदिराशी संबंधित अनेक रहस्यमय गोष्टी आहेत. मूर्तीचे रेशमी केस, डोळे आणि इतर गोष्टी अतिशय खऱ्या असल्यासारखं वाटतं. मंदिरातील गर्भगृहात जी देवता आहे त्याच्यासमोर मातीचे दिवे ठेवण्यात आलेत. महत्त्वाचे म्हणजे हे दिवे कधीच विझत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे हे दिवे कोण लावतात आणि कोण विझवतात हे कळतंही नाही.