Parenting Tips : मुलांच संगोपन करणं ही अतिशय जबाबदारीची गोष्ट आहे. पालक म्हणून मुलांना चांगले विचार आणि संस्कार देणे हे अत्यंत गरजेचे आहे. हल्ली दोन्ही पालक वर्किंग असल्यामुळे मुलांना हवा तितका वेळ देता येत नाही. इन्फोसिस फाऊंडेशनच्या चेअरपर्सन आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांनी पॅरेंटिंग टिप्स सांगितल्या आहेत. वर्किंग पालकांना मुलांचं संगोपन कसं करावं? हा प्रश्न कायमच पडतो. अशावेळी सुधा मूर्ती यांनी सांगितलेल्या टिप्स नक्कीच मदत करतात. सुधा मूर्ती यांनी महिलांना खास टिप्स दिल्या आहेत. ज्या टिप्सने मुलं अतिशय जबाबदार आणि आज्ञाधारक होतील.
अनेकदा पालक आपल्या इच्छा, स्वप्न मुलांवर लादतात. सुधा मूर्ती सांगतात पालकांनी असे अजिबात करू नये. मुलांच्या माध्यमातून आपलं स्वप्न पूर्ण करणे अतिशय चुकीचं आहे. मुलांना त्यांचा मार्ग त्यांना स्वतः निवडू द्या. मुलांच्या उत्तम संगोपनासाठी हे आवश्यक आहे. तुमचं मुलं आहे म्हणून तुमची आवड हीच बाळाची आवड असेल असं नाही. त्यामुळे तुमच्या मुलाला त्याच्या आवडी निवडीसह मोठं होऊ द्या.
पालकांनी मुलांना गॅजेट्स न देता त्यांची मैत्री पुस्तकांशी कशी होईल याची काळजी घ्या. सगळ्या मुलांना मोबाईल, लॅपटॉपसोबत वेळ घालवायला आवडतो. मात्र मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांची मैत्री पुस्तकांशी कशी होईल याची काळजी घ्या. आईने मुलाला झोपताना एखादं पुस्तक वाचून दाखवावं.
अनेकदा आई नकळत आपल्या मुलाची तुलना इतर मुलांशी करते. मात्र हे करणे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येक मुलं वेगळं असतं अशावेळी तुलना करून नकारात्मक विचार मुलावर पाडू नये. पालकांनी या सगळ्याची काळजी घ्यावी. अनेकदा मुलांची तुलना करताना त्यांच्या बालमनावर मोठा परिणाम होतो. बालमनाचं शास्त्र पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे.
मुल आपल्या वयाच्या मुलांसोबत अधिक वेळ घालवतात. अशावेळी अनेक गोष्टींचा प्रभाव मुलांवर पडतो. अशावेळी पालकांनी मुलांना प्रत्येकाचा आदर करावा हे गुण शिकवावेत. कुणासोबतही चुकीचा व्यवहार करू नका.
सुधा मूर्ती सांगतात की, मुलांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू नयेत. याची सवय मुलांना होते. मुलांशी संवाद साधावा त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगाव्यात. तसेच मुलांना काही काळ थांबाव देखील लागतं याची जाणीव करून द्यावी.