दक्षिणेत रोज भात खातात तरी काही नाही, मग महाराष्ट्रातील लोकांचे पोट का सुटतात? ही आहे भात खाण्याची योग्य पद्धत!

Weight Loss  :  दक्षिणेत रोज सकाळ रात्री भात खातात असतात मग त्यांचं पोट का सुटतं नाही. पण महाराष्ट्रातील लोकांनी भात खाल्ला की लगेचच पोट सुटतं असं का ऐकायला मिळतं. कुठे चुकतंय जाणून घ्या त्या बद्दल 

Updated: Dec 4, 2023, 08:33 PM IST
दक्षिणेत रोज भात खातात तरी काही नाही, मग महाराष्ट्रातील लोकांचे पोट का सुटतात? ही आहे भात खाण्याची योग्य पद्धत! title=
South people eat rice every day but they don gain weight so why do people in Maharashtra gain weight and correct way to eat rice how to cook white rice for weight loss

Weight Loss  : वजन नियंत्रणात राहवं म्हणून आज प्रत्येक जण ग्रीन टी, हेल्दी डाएट, जीम आणि अनेक ड्रिंक्सचं सेवन करतात. अगदी ज्यामुळे वजन वाढतं त्या पदार्थांचं सेवन ते बंद करतात. अगदी तो आपला आवडता पदार्थ असला तरी. अनेकांचा समज आहे की, भात खाल्ल्यामुळे वजन वाढतं. त्यामुळे भात खाणे सोडलं जातं. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का? साऊथ इंडियन लोक दिवसरात्र भात खात असतात. त्यांचे अनेक पदार्थ हे तांदळापासून तयार केले असतात. मग तरीदेखील त्यांचं वजन वाढतं नाही. पण आपण जराही प्रेमाने भात खाल्ला की तो अंगाला लागतो आणि वजन वाढतं, असं का?हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर याचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. (South people eat rice every day but they don gain weight so why do people in Maharashtra gain weight and correct way to eat rice how to cook white rice for weight loss)

दक्षिण भारतात भात शिजवण्याची पद्धत?

दक्षिण भारतातील बऱ्याचश्या भागात भात करण्यासाठी पॉलिश न केलेल्या तांदळाचा उपयोग करतात. तर ही लोक भात शिजवण्यासाठी कुकरचा वापर न करता भांड्याचा उपयोग करतात. भांड भात शिजवताना त्यावर येणारा फेस ते लोक काढून टाकतात.

भातातून पोषक तत्व मिळतात!

186 ग्राम पांढऱ्या भातात जवळपास 242 कॅलरीज, 4.43 ग्राम प्रोटीन, 39 ग्राम फॅट्स आपल्याला मिळतात. त्याशिवाय 53.2 ग्राम कार्बोहायड्रेट्स आणि 56 ग्राम फायबर्सदेखील मिळतं. 

भात शिजवताना 'या' चुका टाळा!

दोन ते तीनवेळा पॉलिश केलेला तांदूळ विकत घेणे टाळा, भात व्यवस्थित न शिजवता खाऊ नका, भातावरील फेस आलेलं पाणी आवश्यक काढा आणि भात कुकरमध्ये शिजवून खाणे. या चुका केल्यामुळे भातातील पोषक मुल्य कमी होतात आणि तुमचं वजन वाढतं.

भातात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने तुम्ही भात खाल्ल्यामुळे दिवसभराची उर्जा तुम्हाला मिळती. अजून एक गोष्ट म्हणजे तांदूळ अनेक प्रकारचे असतात. नेहमी चांगल्या क्वालिटीचे लांब तुकड्याचे तांदूळ घ्या. यात छोट्या तांदळाच्या तुलनेत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतात. वेट लॉससाठी रात्री न भात खाता दुपारच्या वेळी भात खाणं योग्य ठरेल. व्हाईट राईसऐवजी ब्राऊन राईस खाणं कधीच योग्य असतं. 

ब्राऊन राईस किंवा पांढरा भात

खरं तर दोन्ही भातांचं सेवन तब्येतीसाठी उत्तम मानलं जातं. पांढरे तांदूळ आणि ब्राऊन राईसमध्ये इतकाच फरक आहे की पांढऱ्या तांदुळांना पचायला बराचवेळ लागतो. तर पॅराबॉईल्ड राईससुद्धा हा आरोग्यासाठी उत्तम असतो. 

रिसर्चनुसार पांढऱ्या भाताऐवजी जर तुम्ही ब्राऊन राईस खायला सुरूवात केली तर वजन कमी होण्यास मदत होते. ब्राऊन राईसचा आहारात समावेश केल्यास दररोज किमान 30 मिनिटं वेगाने चालल्यास फायदा होतो. अभ्यासानुसार रोजच्या आहारात फायबर्सचं प्रमाण वाढवल्याने तुम्ही 100 कॅलरीज कमी करु शकता. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)