मेकअप करण्यापूर्वी तुमच्या स्कीनचा अंडरटोन पाहिलात का? तो ओळखायचा कसा?

MakeUpTips | मेकअप करताना फाउंडेशन बेस चुकीचा निवडल्याने चेहरा खराब होतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या त्वचेचा अंडरटोन माहित असल्यास चुकीचा  फाउंडेशन बेस वापरला जात नाही. त्यामुळे मेकअप छान दिसतो. 

Updated: Feb 13, 2024, 07:36 PM IST
मेकअप करण्यापूर्वी तुमच्या स्कीनचा अंडरटोन पाहिलात का? तो ओळखायचा कसा? title=

प्रत्येक समारंभानुसार मेकअपचा प्रकार बदलतो.कधी ट्रे़डीशनल तर कधी ऑफिसला जाण्यासाठी हलकासा मेकअप प्रत्येकजण करतो. पण तुम्हाला माहितेय का ? मेकअप करण्याआधी तुमच्या त्वचेच्या अंडरटोन माहित असणं फार महत्त्वाचं आहे. 

एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार योग्य मेकअपकरीता तुम्हाला तुमचा अंडरटोन माहित असणं महत्त्वाचं आहे. 

अंडरटोन ओळखायचा कसा ? 
अंडरटोनचे तीन प्रकार असतात. कोल्ड अंडरटोन,वॉर्म अंडरटोन आणि न्युट्रल अंडरटोन, या तीन अंडरटोनवरून  मेकअप कसा करावा हे समजतं. सकाळच्या कोवळ्या ऊन्हात तुमच्या मनगटाच्या शीरा या जर निळ्या किंवा जांभळ्या दिसत असतील तर तुमचा कोल्ड  किंवा कूल अंडरटोन आहे. जर तुमच्या मनगटावरच्या शीरा हिरवट दिसत असतील तर तुमची त्वचा वॉर्म अंडरटोनमध्ये येते. जर तुमच्या मनगटावरील शीरा या मोरपीशी रंगाच्या दिसत असतील तर तुमचा अंडरटोन हा न्युट्रल समजला जातो. 

त्वचेच्या अंडरटोननुसार फाउंडेशन शेड  निवडता येते. जर तुमचा वॉर्म अंडरटोन असेल तर यलो बेस फाउंडेशन तुमच्या स्कीनसाठी योग्य ठरतो. जर तुमचा कोल्ड अंडरटोन असेल तर पिंक बेस फाउंडेशन आणि न्युट्रल अंडरटोन असल्यास पिंक आणि यलो शेडचा बेस फाउंडेशनचा मेकअप सुंदर दिसतो.

अंडरटोननुसार कपडे कसे निवडावे ? 
तुमच्या त्वचेचा रंग हा प्रदुषणामुळे किंवा सूर्यप्रकाशामुळे काळवंडला जातो, मात्र अंडरटोन म्हणजेच त्वचेच्या आतील रंगाचा थर हा कधीही बदलत नाही. त्यामुळे मेकअप प्रमाणेच कपडे निवडताना ही तुमचा अंडरटोन हा फार महत्त्त्वाचा ठरतो. 
वॉर्म अंडरटोन 
 वॉर्म अंडरटोन असणाऱ्या व्यक्तींना पिवळा, केशरी , हळदी कलर शोभून दिसतात, त्याचप्रमाणे इतर रंगाचे कपडे निवडताना ही त्यात वॉर्मशेड असल्यास त्या रंगांचे कपडे शोभून दिसतात. 

कूल अंडरटोन 
या अंडरटोनमध्ये येणाऱ्या व्यक्तींना हिरवा,निळा, असे रंग प्रामुख्याने शोभून दिसतात.   

न्युट्रल अंडरटोन 
ज्या व्यक्तींचा अंडरटोन न्युट्रल असतो सहसा अश्या व्यक्तींना सगळे रंग शोभून दिसतात.  

मेकअप नीट होण्यासाठी फाउंडेशनचा बेस योग्य असणं महत्त्वाचं आहे. फक्त मेकअपच नाही तर दागिने निवडताना तुमचा अंडरटोन माहित असणं महत्त्वाचं आहे.  वार्म अंडरटोन असलेल्या व्यक्तींना सोन्याचे दागिने शोभून दिसतात. तसंच कुल अंडरटोन असलेल्या व्यक्तींना चांदीचे दागिने शोभून दिसतात.त्याचप्रमाणे न्युट्रल  अंडरटोन असलेल्या व्यक्तींना कोणत्याही धातूचे दागिने शोभून दिसतात. 
 
अभिनेत्री दीपिका पदुकोण, सोनम कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांचा वॉर्म अंडरटोन असल्याचं सांगितलं जातं. तर कतरीना कैफ आणि अनुष्का शर्मा यांचा कुल अंडरटोन असल्याचं सांगितलं जातं.    
असं म्हटलं जातं की, तुमच्या त्वचेच्या रंगापेक्षा थोडासा हलका फाउंडेशन वापरल्याने मेकअप चांगला होतो. तुमच्या अंडरटोनबरोबरच तुमची त्वचा ही तेलकट, कोरडी किंवा मिश्र आहे का हे लक्षात घेणं ही तितकच महत्त्वाचं आहे.  

अनेकांना आपल्या दिसण्याचा न्युनगंड असतो. मात्र तुमचा आत्मविश्वास, तुमचा योग्य मेकअप तुमच्या सुंदरतेत भर घालत असतो.त्यामुळे आपल्या त्वचेचा न्यूनगंड न ठेवता  त्वचेचा पोत समजून घेत अपल्या दिसण्यावर भरभरून प्रेम करा.