Valentines Day 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरात अतिशय आनंदाने साजरा केला जातो. अनेकजण या दिवशी आपल्या प्रेमाची कबुली देतात. तर काहींच्या मनात या प्रेमातबद्दल शंका निर्माण होते. लग्नानंतर प्रेम टिकेल का? लग्नानंतर आयुष्य संपून तर नाही ना जाणार? या ना अशा अनेक प्रश्नांनी त्यांच्या मनात घर केलेलं असतं. असं असताना श्री श्री रविशंकर प्रेमाबद्दल काय सांगतात जाणून घ्या.
एका सेशन दरम्यान आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना विचारले की, प्रेम नेहमी काळाबरोबर का कमी होते? 'जेव्हा लोक त्यांच्या नात्याच्या सुरुवातीला असतात, तेव्हा त्यांच प्रेम पराकोटीला असतं. पण जेव्हा तेच लोक एकमेकांशी लग्न करतात तेव्हा प्रेम हळूहळू कमी होऊ लागते. अनेकदा हेच वादाचं आणि नंतर घटस्फोटाचं कारण बनतं. मी हा पॅटर्न आपल्या आजूबाजूला अधिक पाहिला आहे. त्यामुळे मला नात्याची आणि खास करुन लग्न करण्याची भीती वाटते.
(हे पण वाचा - Valentines Day च्या दिवशी मिळालेला नकार कसा पचवाल, 5 गोष्टींनी सांभाळाल हे नातं...)
मुलीच्या प्रश्नाला उत्तर देताना गुरुदेव म्हणाले, 'तुम्ही चुकीचे उदाहरण बघत आहात. अशी अनेक जोडपी आहेत जी सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. त्यांना स्वतःची मुले आहेत आणि नातवंड होण्याची वाट पाहत आहेत. ते आजही एकमेकांसोबत आनंदाने जगत आहेत.
नातेसंबंधात समान लक्ष्य असणं गरजेचं आहे. कारण हेच लक्ष्य तुमचं नातं अधिक घट्ट करतात. तसेच समान लक्ष्य तुमच्या दोघांची वाढ होण्यास अधिक मदत होते. पुढे श्री श्री रविशंकर यांनी स्पष्ट केले की, जर दोन लोक समान ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतात. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या परिस्थितीला एकत्र सामोरे जातात. अशा जोडप्यांमध्ये असे दिसून येते की, त्यांचे वैवाहिक आयुष्य कितीही लांबले तरी त्यांच्यातील प्रेम कमी होत नाही. एवढंच नव्हे तर ते प्रेम अधिक वाढत जाते.
श्री श्री रविशंकर पुढे म्हणाले की, प्रेमाचा रंग काळासोबत नक्कीच बदलतो. लग्नाआधी दोघांमध्ये जी उत्कटता आणि प्रेम होते ते लग्नानंतरही कायम राहण्याची शक्यता कमी असते. पण या बदलाचा अर्थ असा नाही की दोघांमधील प्रेम संपले आहे. श्री श्री रविशंकर म्हणाले की, बदललेल्या रूपात असले तरी प्रेम नेहमीच अबाधित राहते.