मुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकंच डिप्रेशनमध्ये, अभ्यासात खुलासा

एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, जे पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम बनवण्यासाठी भरपूर मेहनत करतात. मात्र त्यांच्यासाठी ही मेहनत अतिशय घातक ठरत आहे. या सगळ्याचा ताण मुलांवर होत असल्याच संशोधनात समोर आलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 10, 2024, 03:42 PM IST
मुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकंच डिप्रेशनमध्ये, अभ्यासात खुलासा  title=

Pressure of Perfect Parenting  :  आपल्या मुलाने आयुष्यात टॉपवर राहू चांगले करिअर घडवावे, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. म्हणूनच, पालक आपल्या मुलांना शालेय शिक्षणासोबतच अतिरिक्त गोष्टींमध्ये उत्तम बनवण्याचा प्रयत्न करतात. अभ्यासासोबतच मुलांना खेळ, कला आणि इतर अनेक कौशल्ये शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, जे पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम बनवण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत त्यांच्यासाठी ते हानिकारक ठरत आहे. आपल्या मुलांना परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करत असताना, पालक आजारी आणि मानसिक स्तरावर खूप दबावाखाली असल्याच संशोधनात आढळले आहे. 

पालकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम

ओहायो विद्यापीठातील संशोधकांनी एक संशोधन केले. या संशोधनात अमेरिकेतील 700 हून अधिक पालकांनी सहभाग घेतला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 57 टक्के पालकांनी कबूल केले की या गोष्टीचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडत आहे. अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, पालकांच्या अंतर्गत आणि बाह्य अपेक्षांबद्दल असमाधानी वाटते. त्यातून पालकांना स्वतःला मानसिक पातळीवर कसे वाटते हेही कळते.

या सगळ्यासोबतच त्यांना त्यांच्या जोडीदारासोबतचे नाते कसे सांभाळायचे याचीही चिंता असते आणि घर व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवण्याचे दडपणही या लोकांवर असते.

परिपूर्ण पालकत्वाच्या मानकांनुसार जगण्याचा प्रयत्न केल्याने अनेकदा थकवा येतो. असे अभ्यासाचे प्रमुख संशोधक आणि ओहायो स्टेट कॉलेज ऑफ नर्सिंगमधील सहयोगी क्लिनिकल प्रोफेसर केट गोलिक यांनी सांगितले.

सोशल मीडियामुळे अपेक्षा वाढवल्या

पालक म्हणून आपल्या मुलांकडून खूप अपेक्षा असतात. आपल्या मुलांनी काय करावे याचा आपण खूप विचार करतो. मग, दुसरीकडे, तुम्ही तुमची आणि तुमच्या मुलांची इतर लोकांशी तुलना करता. पालकांच्या मानसिक आरोग्याचा आणि वागण्याचा त्यांच्या मुलांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होत असतो. मुलांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवली तर पालकांना खूप त्रास होतो. यामुळे, ते कधीकधी त्यांच्या मुलांचा अपमान करतात, टीका करतात किंवा शारीरिक नुकसान देखील करतात.

दुसरीकडे, पालकांसोबत घालवलेला दर्जेदार वेळ मुलांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या जसे की चिंता आणि नैराश्य कमी करू शकतो.

या गोष्टी कराव्यात

अभ्यासात असे दिसून आले आहे की, पालक आपल्या मुलांसोबतचे नाते सुधारण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी शांतपणे त्याचे ऐकावे. नकारात्मक विचार टाळण्याचा प्रयत्न करा आणि सकारात्मक विचार करा. मुलांशी बोला आणि त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत ते त्यांना सांगा. तसेच मुलांना सर्व प्रकारे मदत करा.