सगळ्या पालकांना आपल्या मुलांना चांगल शिक्षण द्यायचं असतं. अगदी लहानपणापासूनच मुलांची स्पर्धा सुरु होते. शिक्षणाची वाढती मागणी आणि इतर सगळ्या गोष्टी यांच्यात मुलं अगदी अडकून जातात. या सगळ्यात मुलांना क्लास कधीपासून लावावा असा प्रश्न पालकांना पडत असते.
मुलांना चांगला क्लास शोधणे हा देखील पालकांसाठी मोठा दिव्य प्रश्न असतो. अनेकदा पालकांना चांगले शिक्षकही मिळत नाही. अशावेळी पालकांनी काही सोप्या टिप्सच्या मदतीने मुलांचा अभ्यास घेणे आवश्यक आहे. तसेच मुलांना कोणत्या वयात ट्युशनला टाकावे हे समजून घ्या.
शाळेत विद्यार्थ्याचे मार्क सतत कमी येत असतील.
होमवर्क पूर्ण करण्यासाठी मुलाला अडचण येत असेल
तुमच्या मुलाला विषय चांगल्या प्रकारे कळत नाही
मुलाला शाळेत जायची इच्छा नाही. शाळा सोडण्याचा विचार करतो.
मुलाला शिक्षणात अडचण येत असल्यामुळे सामान्य व्यवहारातही अडथळा येणे.
मुलाला कोणत्या विषयामध्ये अडथळा येत आहे. हे समजून घ्या
ट्युशन निवडताना त्या शिक्षकाची योग्य ती माहिती जाणून घ्या.
तसेच त्या शिक्षकाशी आपल्या मुलाच्या सद्य स्थितीबद्दल बोलून घ्या.
शिक्षकांची प्रतिक्रिया कशी आहे, हे समजून घ्या.
अनेकदा मुलाचे वर्गमित्र देखील ट्युशनला जात असतात.
अशावेळी पालकांनी त्या वर्गमित्रांशी चर्चा करावी.
ट्युशनचा त्यांचा अनुभव कसा आहे ते देखील जाणून घ्यावे.
तसेच वर्गमित्राच्या पालकांशी संवाद साधणे गरजेचे असते.
कारण त्यांच्या त्या टयुशनबद्दलचा अनुभव कसा आहे हे देखील समजून घेणे तितकेच गरजेचे असते.