पालक मुलांच्या येण्याची चाहुल लागली की, पहिला नावांचा शोध घेतात. मुलांसाठी युनिक आणि ट्रेंडी नावांचा विचार करावा असं प्रत्येकाला वाटत असतं. अशावेळी आपण नवीन, युनिक अशा ट्रेंडी नावांचा विचार करतो. पण तो न करता तुम्ही विस्मरणात गेलेल्या नावांचा विचार करायला हवा. कारण ही नावे तुम्हाला नक्कीच आनंद देतील.
स्वामी - स्वामी या नावाचा अर्थ आहे जगावर राज्य करणारा. तुमच्या मुलाने संपूर्ण जगावर राज्य करावं असं वाटत असेल तर स्वामी नावाचा विचार करा.
समर्थ - समर्थ या नावाचा अर्थ अतिशय युनिक आहे. ताकदवान, कृष्णा असा या नावाचा अर्थ आहे. विस्मरणात गेलेलं हे नाव नक्कीच खास आहे.
पार्थ - पार्थ हे नाव युनिक आहे. पार्थ म्हणजे राजा, तेजस्वी, चांदी आणि अर्जुन असा या नावाचा अर्थ आहे.
अनुज - अनुज या नावाचा अर्थ युनिक आहे. मोठा भाऊ असा या नावाचा अर्थ आहे.
पल्लव - पल्लव हे नाव अतिशय युनिक आहे. पाने, अंकुर असा या नावाचा अर्थ आहे. निसर्गप्रेमी असलेल्या व्यक्तीने या नावाचा नक्की विचार करावा.
सचित - सचित या नावाचा अर्थ आहे शुद्धी, आनंदी. सचित हे नाव जुनं, विस्मरणात असलेलं नाव आहे. पण याचा अर्थ खास आहे.
सिद्धेय - ज्ञान, संपत्ती असा सिद्धेय या नावाचा अर्थ आहे. तुमच्या मुलाने सर्वगुण संपन्न असावं वाटत असेल तर या नावाचा विचार करा.
राधेय - राधाचा भक्त असा या नावाचा अर्थ आहे. राधेय हे नाव कृष्णाशी संबंधित आहे. या नावाचा नक्कीच विचार करु शकता.
विनय - विनय नावाचा अर्थ विनम्र असा आहे. विनम्र, चांगले शिष्टाचार, असा या नावाचा अर्थ आहे.
विपुल - विपुल म्हणजे मुबलक प्रमाणात. भरपूर हुशार असा या नावाचा अर्थ आहे. विपुल हे नाव नक्की निवडा.
निहार - निहार या नावाचा अर्थ युनिक आहे. धुके, ड्रॉप असा याचा अर्थ आहे.
शुभम - विजेता, भाग्यवान, धार्मिक असा याचा अर्थ आहे. शुभम नावाचा नक्की विचार करा.
अनय - अनय हे नाव श्रीकृष्णाच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. या नावाचा अर्थ खास आहे.