मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाचे अनंत अंबानीचे लग्न आहे. 12 जुलै रोजी अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. 3 जुलै पासून अंबानी कुटुंबियांच्या घरी अँटिलिया येथे लग्ना अगोदरचे सोहळे आणि विधी सुरु झाले आहेत. पण या लग्नामध्ये अंबानी कुटुंबिय अनेक रुढीपरंपरा आणि पितृसत्ताक पद्धती मोडताना दिसत आहे. पण यामुळे त्यांच्यावर टीका नाही तर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
अनेक लग्नांमध्ये असे दिसून येते की, मुलीकडची मंडळी सगळी तयार करतात. किंवा त्यांच्यावर सगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. पण अंबानी कुटुंबिय या सगळ्यात वेगळे ठरले आहे. अंबानी कुटुंबियांनी या लग्नसोहळ्याच्या सगळ्या विधींची तयार स्वतः जातीने लक्ष देऊन पाहिली.
नीता अंबानी आणि मुकेश अंबानी हे दोन्ही दाम्पत्य एकत्र कुटुंब पद्धतीचा एक आदर्श जगासमोर ठेवतात. ही परंपरा अगदी अंबानी कुटुंबियांनी सुरुवातीपासून जपली आहे. राधिका असो किंवा श्लोका या दोघींनाही नीता अंबानी यांनी मुलगी ईशाप्रमाणे वागणूक दिली आहे.नीता अंबानी कायमच आपल्या सुनांना समान प्रेम आणि मान देताना दिसतात.
लग्न झालं की, मुलीला आपल्या इच्छा आकांक्षा माराव्या लागतात. मात्र अंबानी कुटुंबियातील चित्र वेगळं आहे. नीता अंबानी स्वतः आपल्या आवडीनिवडी, छंद जोपासताना दिसतात. अगदी त्याचप्रमाणे त्यांनी राधिकाच्या बाबतीतही केलं आहे. नीता अंबानी कायमच राधिका आणि तिच्यामधील गुणांना सपोर्ट करताना दिसतात. एक सासू म्हणून नाही तर एक मैत्रिण म्हणून या दोघींमधील नातं अधोरेखित होतं.
नीता अंबानी आणि ईशा अंबानी यांनी आपले दागिने लग्नाअगोदरच राधिका मर्चंटचा घालायला दिले आहे. या गोष्टी अगदी जुन्या आहेत. अगदी ईशा आणि आकाशच्या लग्नाच्यावेळीही राधिकाने ईशाचा डायमंड घातला होता. लग्नाअगोदर या सगळ्यांमधील नातं इतकं घट्ट आहे की, राधिकाला लग्नानंतर फार वेगळेपण जाणवणार नाही.
नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी जगासमोर अनोखा आदर्श ठेवला आहे. वर पक्षाचे असूनही त्यांनी केलेली तयारी नक्कीच कौतुकास्पद आहे. एवढंच नव्हे तर पाहुण्यांसोबतची त्यांची वागणुक आणि दिलेलं प्रेम याची देखील चर्चा होत आहे. लग्न हे दोन कुटुंबात होत असतं. अशावेळी वरपक्ष किंवा वधुपक्ष असं काही नसावं. दोन्ही लोकं एकच असल्याची भावना असणे महत्त्वाचं असतं.