चुकूनही खाऊ नका पांढरा डाग पडलेलं केळं; यामागील कारण वाचून येईल किळस

Bananas With Small White Spots: तुम्हीपण अनेकदा दबलेलं केळं सोसलल्यानंतर ते उत्तम दिसतंय म्हणून खाल्लं असेल. मात्र अशाप्रकारे पांढऱ्या रंगाचे डाग दिसणारी केळी खाणं धोकादायक ठरु शकतं. हे पांढरे डाग नेमके काय असतात याबद्दल समोर आलेली धक्कादायक माहिती वाचूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 17, 2023, 07:12 AM IST
चुकूनही खाऊ नका पांढरा डाग पडलेलं केळं; यामागील कारण वाचून येईल किळस title=
तुम्हीपण नक्कीच अशाप्रकारची केळी कधी ना कधी पाहिली असतील

Bananas With Small White Spots: केळं आरोग्यासाठी फार फायद्याचं असतं. केळं हे स्वस्तात उपलब्ध असलेलं आणि पौष्टीक फळ मानलं जातं. केळ्यामध्ये आयरन आणि फोलेट मोठ्या प्रमाणात असल्याने या फळाच्या सेवन केल्याने अॅनिमिया या रक्तासंदर्भातील समस्येपासून संरक्षण करता येतं. अॅण्टीऑक्सीडंट, ल्यूटिन, व्हिटॅमिन ए आणि कॅरोटीनॉयडचं प्रमाण केळ्यांमध्ये मुबलक असतं. हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात. अनेकदा केळ्यांवर काळ्या रंगाचे डाग दिसून येतात. कधीतरी पांढऱ्या रंगाचे डागही दिसून येतात. पांढरे डाग तर आपण केळी ठेवताना ती दाबली गेल्याने पडले असावेत असेच वाटतात. अशी केळी अनेकजण सहज खाऊन टाकतात. मात्र अशी केळं खाणं हे धोकादायक ठरु शकतं. या अशाच पांढरे डाग पडलेल्या केळांसंदर्भात एका व्यक्तीने शेअर केलेली माहिती वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

वेळीच सावध व्हा

'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार एका व्यक्तीने फेसबुकवर यासंदर्भातील माहिती शेअर केले आहे. फॅमेली लॉकाडाऊन टिप्स अॅण्ड आयडियाज या ग्रुपमध्ये या व्यक्तीने पोस्ट केली आहे. काही दिवसांपूर्वी आपण बाजारातून केळी घेऊन आलो. मात्र या केळ्यांपैकी काहींवर मला फार विचित्र गोष्ट दिसून आली. ही गोष्ट म्हणजे केळ्यांवर पडलेले पांढऱ्या रंगाचे डाग. तुम्हाला ठाऊक आहे का हे काय आहे? असं म्हणत या व्यक्तीने त्या ग्रुपवर पांढरे डाग पडलेल्या केळांचे फोटोही शेअर केले. प्रथम दर्शनी हे केळं दाबलं गेलं आहे असं वाटू शकतं. दाबलं गेल्याने केळं वरुन थोडं खराब वाटत आहे, असा सर्वसामान्यांचा समज होऊ शकतो. वरवर पाहता हे केळं एका ठिकाणी दाबलं आहे एवढी गोष्ट वगळल्यास ते उत्तम दिसतंय. अनेक केळ्यांसंदर्भात असं घडतं, असा तुमचा विचार असेल तर वेळीच सावध व्हा. आपल्यापैकी अनेकांनी अशाप्रकारचा डाग केळ्यावर पहिला असेल. केळं दाबलं गेल्याने हे होतं हे खरं असलं तरी या व्यक्तीने पुढे जी माहिती दिली ती खरोखरच थक्क करणारी होती. ही माहिती वाचून तुम्हालाही किळस वाटल्याशिवाय राहणार नाही.

त्या पांढऱ्या डागांचा अर्थ काय?

या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, हे केळं केवळ दाबलं गेल्याने असं झालं नव्हतं. ज्या ठिकाणी केळ्यावर पांढरे डाग दिसत आहेत त्या ठिकाणी कोळ्यांचं घरटं आहे. हे पांढरे डाग म्हणजे कोळ्यांची अंडी देण्याची जागा आहे. अशी केळी खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता, असं या व्यक्तीने म्हटलं आहे. इतर अनेक लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये त्यांनाही असा अनुभव आल्याचा दावा केला आहे. मागील वर्षी मलाही असा अनुभव आला. काही केळी खरेदी केली. त्यावर मला असे छोटे छोटे डाग दिसले. आतमध्ये छोट्या आकाराचे कोळीही आढळून आले होते, असं एकाने कमेंट करुन म्हटलं आहे.

कचऱ्यात टाकतानाही घ्या काळजी

अशी केळी कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतानाही विशेष काळजी घ्यावी. केळ्यांवरील हे कोळी तुमच्या घरातील कचऱ्याच्या डब्यात असतील तर घरात पुन्हा पसरु शकतात. एस्डा म्हणजेच एनव्हायरमेंट अॅण्ड सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या प्रवक्त्यांनाही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. केळ्यांवरील पांढरे डाग म्हणजे कोळ्यांचा वास असल्याचे संकेत आहेत. कोळ्यांनाही केळ्याच्या पृष्ठभागावर राहण्यासं आवडतं. याचा परिणाम केळ्याच्या आतील भागावरही होतो असं सांगण्यात आलं आहे. अशाप्रकारे केळं चेपलेलं किंवा दबलेलं वाटलं तर ते खाणं टाळावं. अनेक किडे अशा पदार्थांवर आपली अंडी घालतात किंवा त्या गोष्टींचा निवारा म्हणून वापर करतात.