आषाढ महिन्यात जन्मलेल्या मुला-मुलींसाठी खास नावे

Marathi Unique Boy and Girl Names : आषाढ महिना म्हटलं की, ओढ लागते ती विठुरायाच्या दर्शनाची ओढ असते. भरपूर पाऊस घेऊन येणारा हा महिना खास असतो. या महिन्यात जन्मलेल्या मुलांसाठी अनोखी अशी नावे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 11, 2024, 04:23 PM IST
आषाढ महिन्यात जन्मलेल्या मुला-मुलींसाठी खास नावे  title=
आषाढ महिन्याला हिंदू पंचांगानुसार अधिक महत्त्व आहे. उन्हानंतर पावसाचा गारवा घेऊन हा महिना येतो. एवढंच नव्हे तर या महिन्यात विठुरायाची वारी सुरु होते आणि माऊलीचं दर्शन होतं. प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यातही दोन एकादश्या असतात. या एकादश्यांना असलेले नाव देखील तुम्ही बाळाला देऊ शकता. तसेच आषाढ म्हणजे वारी, आषाढ म्हणजे पाऊस. या महिन्यात जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे. 
 
शयनी - 'शयनी' ही आषाढ महिन्यातील एकादशीचे नाव आहे. अतिशय हुशार, संध्याकाळ, पावसातील एक संध्याकाळ
 
कामिका - 'कामिका' हे देखील आषाढ महिन्यातील एकादशीचे नाव आहे. इच्छा, आकांक्षा असा या नावाचा अर्थ आहे. 
 
फाल्गुनी - पौर्णिमेचा दिवस असा या नावाचा अर्थ आहे. 
 
भूमी - पृथ्वीचा पाया, पृथ्वी असा या नावाचा अर्थ आहे. 
 
भूपाळी -एका रागाचे नाव, भारतीय संगीतातील रागिणी, भारतातील रागिणी असा याचा अर्थ आहे. 
 
दक्षथा - भगवान शिवाची पत्नी, या नावावरुन तुम्ही तुमच्या मुलीचं नाव ठेवू शकतो. 
 
धरा - पाऊस, सतत प्रवाह, जो धरतो, जो टिकवतो हे नाव तुम्ही मुलीसाठी नक्कीच निवडू शकता. हे दोन अक्षरी नाव नक्कीच फायदा मिळेल. 
 
धनिष्ठा - एक तारा असा या नावाचा अर्थ आहे. धनिष्ठा हे नाव मुलीसाठी नक्की निवडू शकता. 
 
मेघ - पावसाळ्यात तुमच्या घरी मुलगा जन्माला आला तर मेघ नावाचा विचार करु शकता. मेघ या शब्दाचा अर्थ आहे ढग. मेघ हे अगदी छोटे आणि सुंदर नाव आहे. 
 
वर्शल - पावसाच्या वातावरणात जर तुमच्या घरी मुलाने जन्म घेतला तर त्याचे नाव तुम्ही 'वर्शल' ठेवू शकता. वर्शल म्हणजे वर्षा. हे खूप सुंदर नाव आहे. 
 
अमाया - अमाया शब्दाचा अर्थ रात्रीचा पाऊस असा होतो. तुम्ही हे सुंदर नाव मुलीचे ठेवू शकता.
 
सरी - तुमच्या घरी छोट्या चिमुकलीने जन्म घेतला असेल तर तुम्ही तिचे नाव सरी ठेवू शकता.
 
श्रावणी - ज्याप्रमाणे श्रावण महिन्यात जन्माला आलेल्या मुलाचे नाव श्रावण ठेवू शकतो त्याप्रमाणे मुलीचे नाव तुम्ही श्रावणी ठेवू शकता.
 
पर्जन्या - पावसाला पर्जन्य असे म्हटले जाते. तुम्ही मुलासाठी पर्जन्य आणि मुलीसाठी पर्जन्या हे नाव ठेवू शकता. 
 
मेघना - मेघना या शब्दाचा अर्थ होतो ढगं. तुम्ही हे सुंदर नाव तुमच्या मुलीचे ठेवू शकता