Healthy Detox Water : मान्सूनचं आगमन झालं पण पावसाने परत दांडी मारलीय. त्यामुळे उष्णतेने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. अनेकांना व्हायरल आजाराने ग्रासलय. त्यात धकाधकीच जीवन आणि कामाचा ताण अन् त्यात बाहेरच्या अनहेल्दी खाण्यावर भर अशात अनेकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. कोलेस्ट्रार आणि यूरिक अॅसिडाची समस्या आजकाल प्रत्येकाला आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. अशात सोमवार ते रविवार हे 7 बॉडी डिटॉक्स ड्रिंक्सच सेवन केल्यास तुमच्या आरोग्यास फायदा होतो. (Monday to Sunday These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy)
सोमवारी - आले, लिंबू आणि हळद या पाण्याचा सेवन करा. या हेल्दी ड्रिंकने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि पचन व्यवस्थित राहण्यास मदत मिळते. शिवाय वजन कमी होण्यासही फायदा होतो.
मंगळवारी तुम्ही मेथीचे पाणी प्या. सकाळी हे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि चयापचय वाढवण्यासही ते प्रभावी ठरतं. अशा परिस्थितीत जर तुम्ही मधुमेहाच्या समस्येने त्रस्त असाल तर मेथी पाणी तुम्हाला फायदेशीर ठरते.
बुधवारी सकाळची सुरुवात जिऱ्याच्या पाण्याने करू शकता. हे ड्रिंक वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं. एवढंच नाही तर पचनाशी निगडीत अनेक समस्या याच्या थोड्या प्रमाणात दूर करते. अशा स्थितीत, पचनाच्या समस्या असल्यास तुम्ही याचे सेवन केल्यास लाभदायक ठरते.
तुम्ही गुरुवारी तुमच्या आहारात ओव्याचे पाण्याचा समावेश करा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ओव्याचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गॅस, फुगवणे, अपचन आणि पोटाशी संबंधित इतर समस्या दूर करण्यास मदत करते.
लिंबू, काकडीच्या पाण्याने दिवसाची सुरुवात केल्यास तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड आणि फ्रेश वाटतं. एवढंच नाही तर याचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्सिफाय होतं.
पुदिना आणि तुळशीच्या बियांचे पाणी शनिवारी घ्या. हे पाणी प्यायल्याने पोट फुगण्याची समस्या दूर होते. याशिवाय, हे हेल्दी ड्रिंक शरीरातील साचलेली घाण काढून तुम्हाला निरोगी बनवते. शनिवारी या हेल्दी ड्रिंकने तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करा.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, आपण बडीशेप पाण्याचं सेवन करा. याच्या सेवनाने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि वजन कमी होण्यास मदत मिळते. याशिवाय पोटफुगीची समस्या दूर होते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)