How to Make Roasted Guava Chutney: शेंगदाणा ते टोमॅटो अशा अनेक पदार्थंची चटणी तुम्ही खाल्ली असेल. पण अनेकांनाच आवडतं फळ पेरूची पण चटणी बनवता येते हे तुम्हाला माहिती आहे का? होय, अगदी बरोबर वाचलत. आपण पेरू (Amrood Ki Chutney Recipe In Marathi) या फळाची चटणी बनवू शकता. या चटणीसाठी जास्त साहित्याचीही गरज नाही. चपाती ते भात तुम्ही कशासोबतही ही चटणी खाऊ शकता. आजकाल बाजारात पेरूही मुबलक प्रमाणत उपलब्ध आहेत. हे फळ खाणे आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. याचमुळे यापासून बनवलेली चटणी खाणे फार फायदेशीर ठरेल. चला भाजलेल्या पेरूची चटणी कशी बनवायची हे जाणून घेऊयात.
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी मुबलक प्रमणात आहेत. अनेकांना माहित नाही की पेरूमध्ये संत्र्यापेक्षा चारपट जास्त व्हिटॅमिन सी असते. याशिवाय पेरूमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. पेरूमध्ये असलेले पोटॅशियम आणि सोडियम उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. पेरूमध्ये असलेले फायबर आपले पाचन सुधारते. पाचन छान राहिल्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो. फक्त पेरूच नाही तर पेरूचे पानही खूप आरोग्यदायी आहे. पेरूच्या पानांचा अर्क मासिक पाळीच्या दरम्यान वेदना आणि पेटके कमी करायला मदत करतात.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)