Kitchen Tips : विकतची कशाला? घरच्या घरी तयार करा वर्षभर पुरेल इतकी कसुरी मेथी!

Kitchen Tips : पदार्थांची चव वाढविण्यासाठी स्वयंपाकात कसुरी मेथी वापरली जाते. बाजारात वेगवेगळ्या कंपनीच्या कसुरी मेथी आपण घरी विकत आणतो आणि तेही भरपूर पैसे मोजून. पण कमी पैसात वर्षभर पुरेल एवढी कसुरी मेथी घरी कशी बनवायची ते आज आम्ही सांगणार आहोत.   

नेहा चौधरी | Updated: Jul 12, 2024, 02:10 PM IST
Kitchen Tips : विकतची कशाला? घरच्या घरी तयार करा वर्षभर पुरेल इतकी कसुरी मेथी! title=
kasuri methi recipe at home kitchen hacks in marathi

Kitchen Tips : उन्हाळा असो किंवा पावसाळा मेथीची भाजी ही भारतीयांना खूप आवडते. मेथीची भाजीपासून अनेक पदार्थ बनवतात येतात. त्यात आता मार्केटमध्ये उपलब्ध असलेली कसुरी मेथी प्रत्येक घरात मिळते. हीच कसुरी मेथी अनेक पदार्थांची चव वाढते. मेथीचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. याच मेथीचा सुकलेला प्रकार आहे कसुरी मेथी. (kasuri methi) बाजारात कसुरी मेथीसाठी भरपूर पैसे मोजावे लागतात. शिवाय ती महिनाभर पुरेल एवढीच मिळते. पावसाळ्यात पालकभाज्या चांगल्या मिळत नाही. अशात वर्षभर कमी पैशात घरच्या घरच्या कसुरी मेथी तुम्ही तयार करु शकता. कमी वेळात, कमी पैशात आणि वर्षभर पुरेल एवढी कसुरी मेथी घरच्या घरी कशी नोट करा स्टेप...(kasuri methi recipe at home kitchen hacks in marathi )

घरच्या घरी अशी तयार करा कसुरी मेथी!

स्टेप 1 : पावसाळ्यात मेथीमध्ये भरपूर माती असते. त्यामुळे सगळ्यात पहिले मेथी स्वच्छ धुवून घ्या.

स्टेप 2: आता मेथी आपण नेहमी निवडतो तशी नाही. तर यासाठी मेथीची पानं काढून घ्या. एकही देठ घेऊन का.

स्टेप 3: आता हे मेथीचे पानं स्वच्छ कापड्याने पुसून चाळणीत काही वेळ ठेवा. 

हेसुद्धा वाचा - महिनाभर कांदा न खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?

स्टेप 4 : आता मायक्रोवेव्ह फ्रेंडली ट्रे (microwave) घ्या यात हि पानं व्यवस्थित पसरवून ठेवा. मायक्रोवेव्ह हाय टेम्परेचरला सेट करा आणि 3-4 मिनिट ठेऊन द्या. 

स्टेप 5 : वेळ झाल्यानंतर तो ट्रे बाहेर काढा आणि पानं नीट व्यवस्थित करा आणि पुन्हा 2 मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये गरम करा. 

स्टेप 6 : आत मेथीची पानं पूर्णपणे थंड झाल्यानंतर दोन्ही हातात ती रगडून पावडर बनवून घ्या. ही पावडर एका हवाबंद डब्ब्यात भरून ठेवा.   

जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही कुकरमध्ये भरपूर मीठ घाला आणि त्यावर एक वाटी उलटी करुन ठेवा. आता जाळीदार भांड्यात मेथीची पानं ठेवा. कूकरला झाकण लावा मात्र सीटी लावू नका.

आता ही पानं चांगले सुकेपर्यंत कुकरमध्ये ठेवा. अधून मधून झाकण उघडून पानं हलवून घ्या. तुम्ही मायक्रोवेव्हशिवाय देखील वर्षभर पुरेल एवढी कसुरी मेथी तयार करु शकता.