गडगंज श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी यांनी दररोज 3 करोड रुपये खर्च केले; तर त्यांची संपत्ती किती दिवसात संपेल

मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा अनंत अंबानी यांचा नुकताच शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचा थाट पाहता मुकेश अंबानी यांची संपत्ती किती? हा चर्चेचा विषय ठरला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 13, 2024, 12:27 PM IST
गडगंज श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी यांनी दररोज 3 करोड रुपये खर्च केले; तर त्यांची संपत्ती किती दिवसात संपेल  title=

सगळीकडेच सध्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाची म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. या शाही विवाह सोहळा आणि त्या आधीचे कार्यक्रम असे 3 जुलै ते 12 जुलैपर्यंत सुरु होते. या दिवसांमध्ये अंबानी कुटुंबियांनी केलेला खर्च हा चर्चेचा विषय होता. अंबानी यांनी या सोहळ्यात कोणतीच कमतरता भासू दिली नाही. यामुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती किती आहे?, असे खर्च केले तर ही संपत्ती संपायला किती दिवस लागतील? अशी देखील चर्चा होत आहे. 

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 10.21 लाख कोटी रुपये आहे. 2024 मध्ये आतापर्यंत त्यांच्या संपत्तीत अंदाजे 1.98 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती एवढी आहे की त्यांनी दररोज 3 कोटी रुपये खर्च केले तर किती दिवसांत त्यांची संपत्ती संपेल हा चर्चेचा विषय आहे.

संपत्ती खर्च करण्याचा कालावधी 

मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती दररोज 3 करोड रुपये खर्च केले तर त्यांची संपत्ती 3,40,379 दिवसांत खर्च होईल. वर्षात 365 दिवस असतात. 3,40,379 हे दिवस वर्षांमध्ये मोजले तर ते 932 वर्षे आणि 6 महिने होतात. मुकेश अंबानी यांची संपत्ती संपायला 932 वर्षे 6 महिन्यांचा कालावधी लागेल. 

2024 मधील संपत्तीमधील वाढ 

 मुकेश अंबानी यांनी त्यांच्या एकूण संपत्तीपैकी दररोज 3 कोटी रुपये खर्च केले किंवा दान केले तर त्यांची सर्व संपत्ती संपायला शतके जातील. ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार, 2024 मध्ये अंबानींच्या संपत्तीत आतापर्यंत सुमारे 1.98 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

अनंत अंबानीच्या लग्नाचा खर्च 

मीडिया रिपोर्टनुसार, अंनत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा खर्च जवळपास 5000 कोटी रुपये झाला. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्तीच्या अवघ्या 0.5 टक्के इतका आहे. पण एवढा खर्च करुनही मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत काहीच घट झालेली नाही. याला कारण शेअर मार्केट.  एनसी फायनान्शियल ॲडव्हायझरी सर्व्हिसेसचे संस्थापक नितीन चौधरी यांनी केलेल्या विश्लेषणानुसार, अंबानी कुटुंबाने अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी 'फक्त' 0.5 टक्के खर्च करत आहे.