Pressure Cooker Hacks : प्रेशर कुकर ही आता काळाची गरज बनली आहे. प्रेशर कुकरमध्ये जेवण लवकर शिजत असल्याने घराघरांमध्ये याचा वापर केला जातो. परंतु अनेकदा कुकरमध्ये डाळ, भात किंवा भाजी शिजवताना अतिरिक्त पाणी झाल्यास कुकरच्या शिट्टीतून पाणी बाहेर येते. पाणी बाहेर आल्याने कुकरच झाकण, गॅस आणि आजूबाजूची भिंत सगळंच खराब होतं. सर्व ठिकाणी उडलेलं पाणी स्वच्छ करताना नाहक त्रास होतो. तेव्हा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात प्रेशर कुकरच्या शिट्टीतून पाणी बाहेर येऊ नये यासाठी सोपा उपाय सांगण्यात आलेला आहे.
इंस्टाग्रामवर ayurvedahealthstudio या यूजरने प्रेशर कुकर संदर्भातील हॅक शेअर केलाय. यात त्यांनी कुकरच्या शिट्टीत तेल ओतण्याचा उपाय सांगितलेला आहे. व्हिडीओमध्ये सांगितल्यानुसार प्रेशर कुकरमध्ये अनेकदा डाळ, भात शिजवताना त्यातून पाणी बाहेर पडतं. तेव्हा हे टाळण्यासाठी तुम्ही कुकरच्या शिट्टीत तेल टाकू शकता. कुकरची शिट्टी काढून त्याच्या होलमध्ये 4 ते 5 तेलाचे थेंब ओता. तसेच कुकरचा रबर काढून त्याठिकाणी सुद्धा थेंबर तेल टाका आणि कडांवर लावून घ्या.
हेही वाचा : प्रेशर कुकरमध्ये भात शिजवण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
हेही वाचा : घरातील प्रेशर कुकर बनेल टाइम बॉम्ब, गॅसवर ठेवण्यापूर्वी चेक करा या 5 गोष्टी
कुकरच्या झाकणाच्या कडांना तेल लावल्यावर पुन्हा रबर लावा आणि मग कुकरमध्ये अन्न शिजवण्यासाठी ठेवा. प्रेशर कुकरच्या शिट्टीत तेल टाकल्यामुळे त्यातून पाणी नाही तर केवळ वाफ बाहेर येते. ज्यामुळे गॅस खराब होत नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्यानुसार हा हॅक खरोखरच उपयोगी ठरतो. परंतु असे व्हायरल हॅक घरी ट्राय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे.