सुखी संसारात माहेरच्या व्यक्तीची लुडबुड ठरेल क्लेशाच कारण, अशी हाताळा परिस्थिती

वैवाहिक जीवन हे आनंदाने, सुखी समाधानाने भरलेलं असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण अनेकदा आपली छोटीशी चूक वादाचं-भांडणाचं कारण ठरु शकतं. अशावेळी मुलींनी काही गोष्टी अतिशय सावधपणे सांभाळणे गरजेचे असते. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 23, 2024, 06:41 PM IST
सुखी संसारात माहेरच्या व्यक्तीची लुडबुड ठरेल क्लेशाच कारण, अशी हाताळा परिस्थिती  title=

लग्नानंतर अनेक नाती निर्माण होतात. अशावेळी मुलीला माहेर आणि सासर यांच्यामध्ये समतोल राखणं गरजेचं असतं. लग्नानंतर अनेक नाती एकत्र येतात, तर अनेक नाती मागेही राहतात. नाती टिकवण्याचे सिक्रेट मंत्र म्हणजे संतुलन राखणे. ज्याच्या मदतीने तुम्ही जुनी आणि नवीन नाती मागे न ठेवता सोबत घेऊन जाऊ शकता. पण अशावेळी नात्यामध्ये थोडं स्मार्ट वागणं अतिशय महत्त्वाचं असतं. 

लग्नानंतर आई-वडिलांशी जास्त जवळीक, प्रत्येक गोष्टीचे शेअरिंग अनेकदा सासरच्या व्यक्तींबाबत नकारात्मक विचार निर्माण करण्यास आणि भांडणे निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. लग्नाआधी आपण बहिणींसोबत आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठी गोष्ट शेअर करतो, कधी गप्पांसाठी, कधी समाधानासाठी, पण लग्नानंतर आपल्या या सवयीमुळे नवरा, सासू, वहिनी यांच्याकडून अनेक तक्रारी येऊ शकतात. तुमच्या घरातील शांतता भंग होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.

तक्रारी करणे बंद करा 

लग्नानंतर नवीन घरात जुळवून घेणं थोडं कठीण असतं, काही वेळा नवीन लोकांशी जुळवून घ्यायला खूप वेळ लागतो, त्यामुळे किरकोळ वाद होऊ शकतात, पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात. आई-वडिलांसमोर आणि विशेषतः बहिणीसमोर तक्रारी करु नका. त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता वाढते आणि काही वेळा कुटुंबातही भांडणे होतात. कारण संभाषणादरम्यान तुम्ही फक्त तुमची बाजू सांगता, दुसऱ्याची नाही आणि त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतो.

तासनतास बोलणे टाळा

लग्नानंतर बहीण किंवा आईशी फोनवर तासनतास बोलल्यानेही जोडीदारासोबतचे नाते बिघडू लागते. तुमच्या जोडीदाराला वाटते की तुमच्याकडे तुमच्या पालकांसाठी वेळ आहे, पण त्याच्यासाठी नाही. एक-दोन तक्रारी करूनही ही सवय कायम राहिल्यास परिस्थिती बिघडू शकते. नवरा बायकोच्या नात्यामधील वाद हा काही काळाचा असतो. पण आपण माहेरच्या व्यक्तीचशी चर्चा करुन ती परिस्थिती बिघडवू शकतो. कारण नवरा-बायकोमधील वाद काही क्षणाचे असतात. पण हे गैरसमज दूर होतात. पण इतर व्यक्तीशी बोलून त्यांच्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. 

पैशाचे व्यवहार टाळा

लग्नानंतर आई-वडिलांना पैसे देऊन मदत करणेही कधी कधी मोठ्या भांडणाचे कारण ठरु शकते. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी याबद्दल बोलून ही लढाई बऱ्याच अंशी थांबवू शकता. तसेच कोणताही व्यवहार करताना तुम्ही तुमच्या पालकांशी बोलणे आवश्यक असते. अशावेळी तुमचं नातं तर घट्ट होतच पण तुमच्या माहेरच्या व्यक्तीचं आणि जोडीदाराचं नातं देखील चांगल होते.