डायबेटिज ते डेंग्यू; 10 आजारांवर रामबाण ठरते एक वनस्पती, तज्ज्ञांनी सांगितलं कसं करायचं सेवन

गुळवेल ही आयुर्वेदातील सर्वात फायदेशीर आणि औषधी वनस्पतींपैकी एक मानली जाते. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे शरीरातील अनेक आजार दूर होऊ शकतात. 

Updated: Aug 25, 2024, 09:15 PM IST
डायबेटिज ते डेंग्यू; 10 आजारांवर रामबाण ठरते एक वनस्पती, तज्ज्ञांनी सांगितलं कसं करायचं सेवन  title=
(Photo Credit : Social Media)

Benefits Of Giloy Leaves : गुळवेल ही आयुर्वेदातील सर्वात फायदेशीर आणि औषधी वनस्पतींपैकी एक मानली जाते. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे शरीरातील अनेक आजार दूर होऊ शकतात. तेव्हा गुळवेलच्या पानांचे सेवन कसे करावे तसेच त्याच्या फायद्यांबाबत जाणून घेऊयात. 

गुळवेलचे फायदे : 

तज्ज्ञांच्या माहितीनुसार गुळवेल, ताप, डेंग्यू, चिकनगुनिया, व्हायरल फिव्हर, सर्दी, खोकला, ऑटोइम्यून डिसीज, डायबेटिज इत्यादी अनेक आजारांवर रामबाण ठरते. यासोबतच गुळवेल रोगप्रतिकारकशक्ती, ब्रेन टॉनिक, एडाप्टोजेनिक नेचरसाठी सुद्धा ओळखले जाते. गुळवेल ताणतणाव कमी करते तसेच यामुळे स्मरणशक्ती आणि मेंदूची शक्ती सुद्धा वाढते.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr Dixa Bhavsar Savaliya (@drdixa_healingsouls)

गुळवेलचे औषधी गुण : 

आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात की, गुळवेल ही एक नॅचरल अँटी इंफ्लेमेटरी, अँटी बायोटिक, अँटी एजिंग, अँटी व्हायरल, अँटी डायबेटिक आणि अँटी कॅन्सर गुणांनी समृद्ध वनस्पती आहे. 

हेही वाचा : घरातील प्रेशर कुकर बनेल टाइम बॉम्ब, गॅसवर ठेवण्यापूर्वी चेक करा या 5 गोष्टी

 

गुळवेलचे सेवन कसे करावे? 

तुमच्या घरात गुळवेलचं रोप असेल तर त्याचे सेवन तुम्ही सहजपणे करू शकता. उदाहरणार्थ, गुळवेलची ताजी पाने आणि देठ रात्रभर भिजवून ठेवा, सकाळी त्यांना कुस्करून घ्या आणि 1 ग्लास पाण्यात उकळवा. मग हे पाणी गाळणीने गाळून घ्या.  याशिवाय, तुम्ही गुळवेलचे सेवन पावडर आणि गोळ्यांच्या स्वरूपात देखील करू शकता.

गुळवेलचे सेवन कोणी करू नये? 

तज्ज्ञांच्या मते गुळवेलचे सेवन कोणीही करू शकते कारण यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मात्र तरीही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय गरोदरपणात महिलांनी याचे सेवन करू नये. 

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)