World Coconut Day : नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात ही अशी ओळ अनेकांनीच शालेय अभ्यासक्रमादरम्यान वाचली असेल. या झाडाला लागणाऱ्या नारळांपासून त्याच्या झावळ्या आणि खोडापर्यंत प्रत्येक गोष्टीचा होणारा वापर आणि नारळाचे, नारळपाण्याचे शरीराला होणारे फायदे पाहता त्याला नेमकं कल्पवृक्ष का म्हटलं जातं या प्रश्नाचंही उत्तर मिळतं.
केसांपासून त्वचा आणि आरोग्याला इतर अनेक मार्गांनी नारळ फायदेशीर ठरतो. पण, प्रत्यक्षात नारळ फळ आहे, बी आहे की सुकामेवा? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का? अनेक देशांमध्ये नारळाचं पाणी आणि त्यातील कोवळं खोबरं विक्रीसाठी उपलब्ध असून, रस्त्यांवरून ये- जा करणारे अनेकजण या नारळाचा आस्वाद घेताना दिसतात. तर मग नारळ, फळ आहे बी?
याचं उत्तर आहे, फळ. वनस्पतीशास्त्रज्ञ नारळाला एक बी असणारं फळ म्हणून संबोधतात. ड्रूप अशी त्याची शास्त्रीय ओळख. हे एक अशा प्रकारचं फळ असतं ज्याच्या अवतीभोवती एक टणक आवरण असतं. आंबा, ऑलिव्ह, चेरी ही याच प्रजातीतील फळांची काही उदाहरणं, बदामही याच प्रजातीत मोडतो असं जाणकार म्हणतात.
ड्रूप प्रजातीच्या फळांमध्ये आवरणांचे तीन थर असतात. यामध्ये बाह्य भागाला एक्सोकॉर्प, मध्य भागाला मेसोकॉर्प आणि अंतर्गत भागाला एंडोकॉर्प असं म्हणतात. सर्वात अंतर्गत गाभा हा रोपाचं सर्वात लहान रुप असतं. नारळाचं बाह्य आवरण म्हणजेच एक्सोकार्प हिरव्या रंगाचं असून ते परिपक्व झाल्यानंतर करड्या रंगाचं दिसू लाहतं. तर, मेसोकॉर्प म्हणजे खाण्यासाठी वापर करता येणार नाही असा भाग. नारळाच्या एका टोकाळी अतिशय लहान असा नारळाचाच एक अंश असतो. हा असतो एंडोक़ॉर्प.
नारळ सुक्यामेव्यातील 'Nut' ची परिभाषा पूर्ण करणारा असला तरीही तो सुकामेवा गटात मोडत नाही. प्रत्यक्षात Nut च्या कोणत्याही प्रकाराला पुन्हा अंकुरित होण्यासाठी कोणा एका जनावराच्या पचनक्रियेतून पुढे जावं लागतं किंवा नैसर्गिकरित्या त्याचं विघटन होणं गरजेचं असतं. पण, नारळ या पैकी कोणत्याही क्रियेतून पुढे न जाता नव्यानं अंकुरित होऊ शकतो.
एका नारळामध्ये किती कॅलरी?
नारळातील खोबरं नुसतं किंवा विविध बदार्थ, बेक बदार्थ, जेवण किंवा तत्सम गोष्टींसमवेत वापरलं जातं. एता नारळामध्ये 185 कॅलरी, 18 ग्रॅम तंतूमय घटक, 7 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 2 ग्रॅम प्रोटीन अशी पोषक तत्वं असतात. तर, नारळ पाण्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्निशियम, फॉस्फोरस असे घटक आढळतात.