Shivjayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित 3 भाषणे, रोमा रोमात संचारेल हिंदुत्व ...

Shivaji maharaj speech : छत्रपती शिवाजी महाराजांप्रती भाषणातून व्यक्त करा कृतज्ञता, 'या' मुद्यांचा समावेश महत्त्वाचा 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 17, 2024, 09:39 AM IST
Shivjayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित 3 भाषणे, रोमा रोमात संचारेल हिंदुत्व ... title=

Chhatrapati Shivaji Maharaj Speech : भारताचं आराध्य दैवत मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे जयंती आहे. महाराजांनी अवघ्या वयाच्या 16  व्या वर्षी स्वराज्याची संकल्पना राबवायला सुरुवात केली. आपल्या शौर्यानं आणि चातुर्यांनं मुघलांच्या सैन्याला हरवत आपल्या पदरी त्यांनी न भूतो न भविष्यती असे यश प्राप्त केले. आजही महाराजांची रणनिती, स्वराज्याबद्दलची ओढ, महिलांचा सन्मान, सकारात्मक यासारख्या असंख्य गोष्टी शिकण्यासारखं आहे. महाराजांचा संपूर्ण जीवनपटच आपल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. 

छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त शाळा, महाविद्यालय किंवा वेगवेगळ्या ठिकाणी भाषणांचे आयोजन केले जाते. महाराजांच्या जीवनपट असा 10 ओळींच्या शब्दात मांडणे तसे कठीणच पण भाषण सर्वोत्तम होण्यासाठी खालील भाषणांच्या नमुन्यांचा आणि 10 महत्त्वाच्या मुद्यांचा नक्की विचार करा. महाराजांसाठी तुमच्याकडून हा मानाचा मुजरा ठरेल. 

भाषणाचा पहिला नमुना 1

नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी,
नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी।
नमो धर्मभूमी जिच्या कामी,
पडो देह माझा सदा ती नमामी ।।

परमपवित्र माझ्या या मातृभूमीला नमस्कार, सन्मानहीय व्यासपीठ व येथे जमलेल्या माझ्या सर्व रसिक श्रोतोहो, मी ______ आज तुमच्याशी एका अश्या महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे, ज्यांचा  मला तुम्हाला नाही तर संपूर्ण  देशाला अभिमान आहे. 

सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला
भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला
हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला
महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला.

मित्रानो साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्वान वीरपुत्र मिळाला. ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होत करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला.

त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रु लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांच्या कोणी कैवारी नव्हता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, जगमता पेटता अंगार. आणि अखेर ती वेळ आली. सहियाद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी वर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजाला. ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला…. ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला….

गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले. यासाठी त्यांनी पुणे, मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यांच्या मनात स्वराज्य बद्दल आस्था निर्माण केली. या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, मुरारबाजी, येसाजी कंक यासारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राण्यांचीही बलिदान देतांना मागेपुढे पाहिले नाही. 

शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायां नंतरही अनेक राजे उदयास आले. पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त शिवाजी महाराज. याचे कारण आहे त्यांचे स्वराज्य बद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यासोबत स्वराज्यासाठी दिवस-रात्र झटायचे. 

शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न असे व्यक्ती होते. काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत, कितीही संकटे आले तर डगमगून न जाता त्यावर शिताफीने मात करत. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढ्य शत्रूंशी लढा देत एका वीर पुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले.

हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता.
हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता.
अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता
असा जिजाऊचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक होता.
अशा या थोर महापुरुषाचा जय जयकार तर झालाच पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की…. जय जय

भाषणाचा पहिला नमुना 2

आजच्या या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, तसेच सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू-भगिनींना.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर संपूर्ण देशात व देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्यात उत्साहाने साजरी होत आहे, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, अश्या अनेक उपक्रमाने आज जयंती साजरी होताना दिसत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची तोडमोड केली जात आहे महाराष्ट्राच्या अनेक संघटनांनी आपापल्या परीने शिवचरित्र जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते.आजचे राजकीय पक्ष मात्र आपल्या सत्तेसाठी त्यांचा उपयोग करताना दिसत आहेत. तारीख, तिथीच्या वात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमतो आहे, दुर्दैव या मातीच आज त्यांच्याच मातीत, त्यांच्याच स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज हे एक राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोगी पडणारे समीकरण ठरलेले आहे. आजचे रजनेते शिवरायांच्या नावाने मतपेटीत मतांची भीक मागत फिरत आहेत.

मावळ्यांनो छत्रपती शिवाजी महाराज राजकीय लढवय्ये नक्कीच होते. परंतु, विशिष्ट एखाद्या पक्षांसाठी मर्यादित नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे एखाद्या विशिष्ट जाती धर्मासाठी संघर्ष करणारे राजे नव्हते. आपल्याच महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या महापुरुषांच्या जन्मतारखे वरून वाद पेटवला जातो, जाती-धर्मात शिवरायांना गुंतवून ठेवले जाते, ही लाजिरवाणी बाब आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची निती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचे संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अमलात आणणे काळाची गरज आहे. शिवाजी महाराजांचा संघर्ष हा कुठला जात व धर्म संघर्ष नव्हता. तर शिवाजी महाराजांचा संघर्ष रयतेच्या राज्यासाठी होता. शिवराय सर्व जाती धर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या स्वराज्यात जाती धर्माला थारा नव्हता.

जगात शिवनीतीचा वापर करून अनेक योद्धे लढाई जिंकण्याची उदाहरणे आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, जर शिवाजी महाराजांच्या देशात जन्माला आले असते, तर आम्ही त्यांना सूर्य संबोधले असते. या महाराष्ट्रात शिवरायांचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे.

इंग्रजांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले. परंतु, जाताजाता इंग्रज गव्हर्नर म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज जर आणखी 10 वर्षे जगले असते, तर इंग्रजांना हिंदुस्तानच्या चेहरा पाहता आला नसता.. असे होते आमचे रयतेचे राजा छत्रपती शिवराय.!

महाराजांवर भाषण करता खालील 10 मुद्दे अत्यावश्यक

  • शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव 'शिवाजीराजे शहाजीराजे भोसले' होते.
  • शिवाजी महाराजांच्या आईचे नाव 'जिजाबाई जाधव' आणि वडिलांचे नाव 'शाहजी भोसले' होते.
  • 14 मे 1640 रोजी शिवाजी महाराजांचा विवाह झाला.
  • शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव 'सईबाई निंबाळकर' होते.
  • शिवाजी महाराज लहानपणापासूनच धैर्यवान आणि अनेक कलांमध्ये पारंगत होते.
  • शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचे नाव 'संभाजी' होते.
  • 6 जून 1674 रोजी झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव केला.
  • 1674 मध्ये रायगड येथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
  • छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान राजे होते.