अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची लव्हस्टोरी.. अशी झाली दोघांची पहिली भेट

Anant Ambani Radhika Merchant Love Story : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचं लग्न राधिका मर्चंटसोबत होणार आहे. लग्नाच्या प्री वेडिंग सेरेमनीची सुरुवात 1 मार्चपासून सुरु होणार आहे. या दोघांच्या प्रेमाची गोष्ट खूप खास आहे. जाणून घ्या कशी झाली दोघांची पहिली ओळख. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 1, 2024, 06:39 PM IST
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची लव्हस्टोरी.. अशी झाली दोघांची पहिली भेट  title=

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी जुलै 2024 मध्ये लग्न करणार आहे. लग्न हे एक पवित्र बंधन आहे. यामध्ये अंबानी घराण्याचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी याआधीच लग्नबंधनात अडकले आहेत. आता कुटुंबातील सर्वात तरुण सदस्यही सात फेरे घेऊन वैवाहिक जीवनात पाऊल ठेवतील. एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी राधिका अनंतची लाईफ पार्टनर बनणार आहे. लग्नाच्या मुख्य कार्यक्रमापूर्वी 1-3 मार्च या कालावधीत प्री-वेडिंग फंक्शन्स आयोजित केले जातील, ज्यातील प्रत्येक तपशील एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. बरं, अनंत आणि राधिकाचं नातंही स्वप्नासारखं आहे. या जोडप्याच्या बालपणीच्या मैत्रीचे आयुष्यभराच्या बंधात कसे रूपांतर झाले ते जाणून घेऊया.

कशी झाली दोघांची पहिली भेट

काही मीडिया रिपोर्टनुसार, अनंत आणि राधिका बालपणापासूनच एकमेकांना ओळखत होते. एवढंच नव्हे तर कॉलेजमध्येही या दोघांची मैत्री कायम होती. मात्र काही रिपोर्ट्सचा असा दावा आहे की, 2022 मध्ये या दोघांचा रोका करण्यात आला. तेव्हा कुटुंबियांनी सांगितलं की, अनंत-राधिका गेल्या काही वर्षांपासून या दोघांची ओळख जास्त झाली. ही ओळख लहानपणापासूनची असो किंवा अगदी काही वर्षांपूर्वीची पण या दोघांचा बाँड कायमच स्ट्राँग राहिला आहे. 

पावला पावलाला दिली साथ 

प्रत्येकाला असं वाटतं की, असाच जीवनसाथी प्रत्येकाला मिळावा. कारण या दोघांनी एकमेकांना पावलो पावली साथ दिली आहे. वेळ चांगली असो किंवा वाईट पण हे दोघं जोडीदार म्हणून एकमेकांच्या कायम सोबत होते. अनंत अंबानी यांच्या जीवनात राधिका मर्चंटची साथ कायमच एक उत्तम उदाहरण ठरली आहे.

एका मुलाखती दरम्यान अनंत अंबानी यांनी आपल्या ओबेसिटीबद्दल सांगितलं होतं. यामुळेच त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र त्यांच्या कठीण प्रसंगी राधिका मर्चंटची साथ अतिशय महत्त्वाची ठरली आहे. राधिका आणि अनंत या दोघांची जोडी एक सर्वोत्तम उदाहरण ठरली आहे. राधिकाला तर लग्नापूर्वीच 100 पैकी 100 गुण मिळाले आहे. 

राधिकाने वाढवली हिम्मत 

अनंत अंबानी यांनी हे देखील सांगितलं की, अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावूनही कधीच कुटुंबियांनी मी आजारी असल्याच भासवलं नाही. यासोबतच राधिकाने अनंत अंबानीला दिलेली साथ ही कायमच कौतुकास्पद आहे. यामुळे अनंत अंबानी यांची हिम्मत वाढली. घरातील व्यक्तींनी कायमच सांगितलं की, कधीच हिम्मत हरू नको कायम लढत राहा. तुमच्यापेक्षा अनेक लोक आरोग्याच्या समस्या सहन करत आहेत. त्यामुळे तू आपल्या परिस्थितीसाठी कृतज्ञ राहा. 

राधिका माझ्या आयुष्यातील राणी 

प्रत्येक मुलाला वाटतं की, आपली जोडीदारही एखाद्या राणीप्रमाणे असावी. अनंत अंबानी यांची ही इच्छा तेव्हा पूर्ण झाली जेव्हा ते राधिकाला भेटले. अनंत यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, त्यांना लग्न करायचं नव्हतं. संपूर्ण आयुष्यभर प्राण्यांची सेवा करायची होती. पण जेव्हा अनंत अंबानी यांची राधिकाशी भेट झाली तेव्हा त्यांना आलं की, राधिकाला देखील ऍनिमल लवर असून प्राण्यांची काळजी घेते. एवढंच नव्हे तर अनंत अंबानी म्हणाले होते की, राधिका जीवनात आल्यामुळे त्यांना आपण खूप लकी असल्याचं जाणवत आहे. ती माझ्या स्वप्नांची राणी आहे, असं अनंत सांगतात. 

प्री वेडिंगसाठी जामनगरच का? 

अनंत अंबानी आणि त्यांची नववधू राधिका मर्चंट जामनगरमध्ये तीन दिवसांची प्री-वेडिंग पार्टी आयोजित करत आहेत. जो १ मार्चपासून सुरू होत आहे. त्याच्या एका मुलाखतीत, लग्नाआधीच्या लग्नासाठी त्याने जामनगर का निवडले याचा वराने खुलासा केला. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की जामनगर हे त्यांच्या आजीचे जन्मस्थान आहे आणि याच जामनगरच्या भूमीवर त्यांचे आजोबा धीरूभाई अंबानी आणि वडील मुकेश अंबानी यांनी व्यवसाय सुरू केला. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी हे स्थान खूप महत्त्वाचं आहे.