अंड उकळल्यानंतर पाणी फेकून देता? पाण्याचे फायदे जाणून घ्या

Egg Water Benefits : अंड उकळल्यानंतर ते पाणी आपण फेकून देतो. पण असं न करता त्या पाण्याचा वापर योग्य पद्धतीने केल्यास मिळतील जबरदस्त फायदे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 10, 2024, 04:23 PM IST
अंड उकळल्यानंतर पाणी फेकून देता? पाण्याचे फायदे जाणून घ्या  title=

अंडा हा व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीमध्ये मोडतो. त्यामुळे बहुतांश लोकं अंड्याचे सेवन करतात. अनेकजण अंडी उकळून खाणे पसंत करतात. पण अंड्याशी संबंधित काही खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? 

तुम्ही देखील अंडी उकळल्यानंतर ते फेकून देत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अंडी उकळल्यानंतर आपण ते पाणी सहज फेकून देतो. पण असं न करता त्या अंड्याचा योग्य तो वापर केल्यास त्याचे जबरदस्त फायदे अनुभवता येतील. 

पोषकतत्त्व 

अंड्याच्या टरफलांमध्ये योग्य प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम आणि योग्य प्रमाणात फॉस्फरस, कॅल्शियम आणि सोडियम असेत. अशावेळी आपण अंडी उकळतो तेव्हा त्यातील जीवनसत्त्वे त्या पाण्यात उतरतात. ही जीवनसत्वे असलेलं पाणी जर झाडांना घातला तर त्याचा फायदा झाडांना मिळतो. झाडांची चांगली वाढ होते. फुलं, फळं मुबलक प्रमाणात येतात. 

खत म्हणून होतो वापर 

उकळलेल्या अंड्यांची टरफल आणि अंड्याचे उकळलेले पाणी दोन्ही खतासमान आहेत. एका संशोधनात याचा खुलासा झाला आहे. मास्टर्स गार्डेनर ऑफ हेमिल्टनद्वारे माहिती जाहीर केली आहे. या अभ्यासानुसार, तुम्ही ज्या पाण्यात अंडे उकळता त्या पाण्यातील पोषकतत्त्वांचा फायदा झाडांना होतो. हे खत अतिशय फायदेशीर ठरते. 

टोमॅटोच्या झाडांसाठी फायदेशीर 

ज्या झाडांना योग्य प्रमाणात ऊन मिळ नाही त्यांच्यासाठी हे पाणी अतिशय फायदेशीर असते. एका संशोधनात असे समोर आले आहे की, हे पाणी टोमॅटोच्या झाडांना वापरले तर त्याचा फायदा झाडांना होतो. चांगल्या प्रतीचे टोमॅटो झाडाला येतात. तसेच मिरचीच्या झाडाला देखील याचा फायदा होतो. 

अंडे मानवी शरीरासाठी जसे उपयोगी आणि फायदेशीर आहे. अगदी तसेच ते झाडांसाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. तुम्ही तुमच्या घरातील छोट्या गार्डनला हा प्रयोग नक्कीच करुन पाहू शकता. कारण घरच्या गार्डनला याचा नक्कीच फायदा होतो. त्यामुळे आजपासून ही बातमी वाचल्यानंतर अंड्याच्या टरफलांचा आणि त्याच्या उकळलेल्या पाण्यांचा नक्की वापर करा.