चिंताजनक : 'शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच...' अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टनंतर एकच खळबळ

कुशल त्याच्या मनातील भावना चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो यावेळी मात्र त्याने...

Updated: Nov 9, 2022, 08:05 PM IST
चिंताजनक : 'शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच...' अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टनंतर एकच खळबळ title=

मुंबई :  'चला हवा येऊ द्या' च्या शोमुळे घराघरात पोहोचलेला कलाकार कुशल बद्रिके (Kushal Badrike). आपल्या नाविण्यपूर्ण अभिनयाने कायमच सर्वांना आनंद देत असतो. आपण प्रेक्षकांनी कुशल बद्रिकेचा आतापर्यंत प्रवास पाहिला आहे. त्याचप्रमाणे त्याला कुटुंबियांकडून मिळणारी साथ अतिशय खंबीर आहे.  कुशल कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांसोबत नेहमी पोस्ट शेअर करत असतो. दरवेळी कुशल त्याच्या मनातील भावना चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो. यावेळी देखील कुशलने एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

दोन फोटो शेअर करत कुशल बद्रिकेने कॅप्शनमध्ये लिहीलंय की,  ''मी एकट्याने कधीच सिनेमा पाहीलेला नाही, interval, मधला समोसा आणि पॉपकॉर्न share करण्यात सिनेमा पेक्षा जास्त मज्जा आहे अस मला नेहमी वाटत, एकटाच असा hotel मद्धे जाऊन मी कधी जेवलेलो नाही, मला काय order करावं हेच सुचत नाही , तसंच एकट्याने प्रवास करायला सुद्धा मला आवडत नाही, कदाचित मला माझ्याच सोबत खुप बोर होत असावं,  पण आज सिनेमाच्या shooting साठी एकट london ला जावं लागतय, international प्रवासात, पृथ्वी चा व्यास ओलांडताना घड्याळाचा तासही बदलतो ही गोष्ट मला अजूनही जादुई वाटते. 

खिडकीतून दिसणारे ढग, ढगांच्या चाळणीतून दिसणारा समुद्र, त्यातुन डोकावणारा सुर्यप्रकाश अवेळी रात्र ह्या सगळ्यात कुणीतरी गप्पा मारणार हव यार . पण आयुष्याच्या प्रवासात शेवटा पर्यंत आपल्याला साथ करणारे फक्त आपणच असतो, काही लोक हाथ सोडवून घेतात तर काहींचे हाथ आपल्या हातून अलगद सुटतात, शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच करावा लागतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मग एखादा विमान प्रवास एकट्याने करायला काय हरकत आहे , पण तरीही वाटतं…. किमान international travel मधे आपल्या वाट्याचे 2 पेग प्यायला तरी कुणी हव होत….Happy journey,To me''  या पोस्टनंतर हे स्पष्ट होतंय की, अभिनेता लंडनला शूटिंगसाठी एकटा जातोय त्यामुळे तो नाराज दिसत आहे. या पोस्टवरुन त्याने स्पष्ट केलं आहे की, त्याला त्याच्या आयुष्यात आजुबाजूला माणसं हवी असतात.