खारेपाटण : कोकण दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात झालाय. या अपघातातून आदित्य ठाकरे बचावले आहेत.
आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग येथून रत्नागिरीला जात असताना खारेपाटण चेकपोस्ट या ठिकाणी हा अपघात झाला. आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या मागे त्यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्या होत्या. त्यातील एका गाडीच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे त्या गाडीपाठीमागून येणाऱ्या तीन ते चार गाड्या एकमेकांवर येऊन आदळल्या.
खारेपाटण चेक पोस्ट येथे असलेल्या मधुबन या हॉटेलसमोर हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सुखरुप आहेत. मात्र, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.