ठाणे: वीज चोरीचा अनुभव बहुतेकांना येतो. मात्र, रिमोटद्वारे किंवा जॅमरचा वापर करुन वीज चोरी केली जाते. ठाण्यात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत आहे. विशेष म्हणजे याचा खुलासा स्वतः ठाणे वीज महावितरण विभागानेच दिला आहे.
अशाप्रकारे वीज चोरी करणारे काही ठिकाणी मीटरमध्ये एक विशिष्ट प्रकारचा स्विच बसवून तो मीटर रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित करतात. तर काही ठिकाणी एक जॅमर नावाचं उपकरण वापरून मिटर बंद करुन वीज चोरी केली जाते.
यावर महावितरण प्रतेक ग्राहकाकडून होणाऱ्या वीजवापराचा अभ्यास करुन वीजचोरी रोखण्याचे उपाययोजना आखत आहे. याचाच भाग म्हणून महवितरणने १ सप्टेंबरपासून राज्यभरात विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार वीजचोरी करणारे ग्राहक तसेच रिमोट आणि जॅमर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई सुरु केली आहे. तर वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या रक्कमेच्या १० टक्के रक्कम रोख स्वरुपात बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.