मुंबई : न्याय दंडाधिकारी न्यायालय जाणीव पूर्वक जामीन सुनावणी लांबवत असल्याचे अर्णब गोस्वामींच्या वकिलांनी कोर्टात म्हटले. अर्णब यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. एस.एस.शिंदे आणि एम.एस.कर्णिक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. काल झालेल्या सुनावणीच्या पुढे सुरू आजच्या सुनावणीचे कामकाज सुरु झालंय.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास रायगड पोलिसांनी बंद केला होताय. पुराव्याअभावी ही फाईल बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान तपास बंद करण्याआधी तक्रार दाराला कळवले नाही असे नाईक यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. पुन्हा तपास सुरू करण्यासाठी पोलिसांना न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक होते असे वकिलांनी म्हटलंय.
जर आपण लवकर आपले म्हणणे मांडले नाही तर आपल्याला पुढील तारीख ही २३ नोव्हेंबरनंतर मिळेल असे न्यायालयाने म्हटले. आपण सत्र न्यायालयात जावे. आपणास न्यायालयात काही दिवसातच वेळ देईल. जर आपण सत्र न्यायालयात गेलात तर उच्च न्यायालय सत्र न्यायालयाला ४ दिवसात ( मंगळवार) पर्यंत सुनावणीच्या ऑर्डर घेण्याचे निर्देश देऊ शकेल असे यावेळी न्यायालयातर्फे सांगण्यात आले. दरम्यान हे प्रकरण आपणच हाताळावे ही विनंती वकिलांमार्फत करण्यात आली