पालघर पोटनिवडणुकीत भाजपच्या राजेंद्र गावितांचा विजय

पालघर पोटनिवडणुकीचा निकाल हाती

Updated: May 31, 2018, 02:42 PM IST
पालघर पोटनिवडणुकीत भाजपच्या राजेंद्र गावितांचा विजय title=

मुंबई : पालघर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा विजय झाला आहे. पालघर पोटनिवडणूक राजेंद्र गावित यांचा ४४ हजार मतांनी विजय झाला आहे. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना २ लाख ३७ हजार मतं पडली आहेत. गावित यांना २ लाख ६३ हजार मतं पडली आहेत. जनतेच्या पाठिंब्यामुळे आपला विजय झाला असल्याचं राजेंद्र गावित यांनी म्हटलं आहे. पालघरमध्ये भाजपने जोरदार सेलिब्रेशन सुरू केलं आहे.

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. शिवसेनेने चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली. तर भाजपने काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांना आपल्या पक्षात घेत उमेदवारी दिली. पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना भाजप यांच्यात चांगलीच जुंपली. शिवेसेनेने मुख्यंत्र्यांची क्लिक जाहीर करुन पोटनिवडणुकीत भाजपला उघड पाडण्याचा प्रयत्न केला. तर शिवसेनेने अर्धवट क्लिप दाखवून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. 

विजयानंतर राजेंद्र गावित यांची प्रतिक्रिया