Suryakumar Yadav चं शतक पाहून Virender Sehwag देखील भारावला, म्हणतो 'आम्ही आत्मविश्वासाने..'

Virender Sehwag on Suryakumar Yadav : अनेक दिग्गज खेळाडूंनी सूर्यकुमार यादवचे गोडवे गायले, अशातच आता टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने देखील सूर्याचं तोंडभरून कौतूक केलंय.

Updated: May 13, 2023, 05:30 PM IST
Suryakumar Yadav चं शतक पाहून Virender Sehwag देखील भारावला, म्हणतो 'आम्ही आत्मविश्वासाने..' title=
Virender Sehwag ,Suryakumar Yadav

Suryakumar Yadav IPL Century: सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) गुजरात टायटन्सच्या कसलेल्या गोलंदाजांना टप्प्यात घेत 49 बॉलमध्ये नाबाद 103 धावा ठोकल्या आणि सामन्याचा निकाल लागला. गुजरातचा 27 धावांनी पराभव करत मुंबईने (MI vs GT) पराभवाचा वचपा काढलाय. अशातच आता सूर्याच्या या अफलातून खेळीचं कौतूक होताना दिसतंय. अनेक दिग्गज खेळाडूंनी सूर्यकुमार यादवचे गोडवे गायले, अशातच आता टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने देखील सूर्याचं तोंडभरून कौतूक केलंय.

काय म्हणाला सेहवाग ?

सूर्याने केवळ आपल्या बॅटिंगने वानखेडेचे मैदान उजळून टाकलं तर आयपीएल स्पर्धेचा उत्साह देखील वाढवला आहे. सूर्याने गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) खेळाडूंनाही आपल्या झंझावाती खेळीने चाहता बनवलंय. गुजरातच्या खेळाडूंनी सूर्याचे ज्या पद्धतीने कौतुक केलं ते पाहण्यासारखं होतं. यावरून सूर्या उत्तम फलंदाज असल्याचं दिसून येतंय. आता आपण पूर्ण आत्मविश्वासाने म्हणू शकतो की 'सूर्य असेल तर सर्व काही शक्य आहे', असं म्हणत वीरेंद्र सेहवागने सूर्यकुमार यादवचं (Virender Sehwag on Suryakumar Yadav) कौतूक केलं आहे.

सूर्या फाइन लेग आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकांसोबत चेष्टा करत होता. त्याच्या फलंदाजीदरम्यान आपल्याला खूप चांगले स्वीप शॉट्स पाहायला मिळतात. सूर्याच्या या फटक्यामुळे गुजरातच्या फिरकीपटूंची लय बिघडवली आणि शतक झळकावून आपल्या संघाला मजबूत पकड मिळवून दिली. त्याची स्फोटक आणि दमदार खेळी पाहूनच विष्णू विनोदने बॅटने अप्रतिम खेळी केली, असंही सेहवाग म्हणाला आहे. 

आणखी वाचा - संजू राखतोय धोनीची परंपरा, Yashasvi Jaiswal च्या शतकासाठी Sanju Samson ने असं काही केलं की...

दरम्यान, सूर्याने आपल्या 360 डिग्रीच्या कलेवर शतक झळकावलं. त्याची खेळी ही कौतुकास्पद आहे, असंही सेहवाग म्हणतो. विराट कोहलीने देखील सूर्यकुमारच्या या अफलातून खेळीचं कौतूक केलं.  तुला मानलं भाऊ... असं मराठमोळ्या अंदाजात विराटने (Virat Kohli) सूर्यावर कौतूकाचा वर्षाव केलाय. तर सचिनने देखील ड्रेसिंग रूममध्ये सूर्याच्या खेळावर प्रतिक्रिया दिली.