Rohit Sharma in IPL 2023: क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2023 ची सुरूवात 31 मार्च (IPL 2023) पासून सुरू होणार आहे. आयपीएलच्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) व कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma ) याच्या कामगिरीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आता आयपीएल 2023 सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma IPL 2023) हंगामातील काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल 2023 हंगामाचे काही सामने खेळणार का खेळू शकणार नाही? जर मुंबई इंडिन्सचा कर्णधार रोहित शर्मा संघातून बाहेर पडणार असेल तर त्याच्या जागी म्हणजे मुंबई इंडियन्सचा कर्णधाक कोण असेल?
आयपीएलचा 16 वा (IPL 2023) हंगामा सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. याचपार्श्वभूमीवर खेळाडू आपापल्या घरच्या मैदानावार जोरदार सराव करत आहेत. पण याच दरम्यान मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा या हंगामातील सुरूवातीचे सामने खेळू शकणार नाही. कारण रोहित शर्मा हा वर्कलोड मॅनेजमेंटमुळे सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर असेल.
वाचा : पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, चेक करा आजचे दर
आयपीएल फायनलनंतर टीम इंडियाला एका आठवड्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (World Test Championship Final) खेळायची आहे. त्याचबरोबर यानंतर सर्व खेळाडू मायदेशात होणाऱ्या विश्वचषकाला तयारीला लागतील. रोहित शर्माच्या (Rohit Sharma IPL 2023) अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळणार आहे. तर दुसरीकडे या संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवाय झ्ये रिचर्डसन दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर आहे. अशा स्थितीत गोलंदाजी विभाग मुंबई इंडियन्ससाठी अडचणीचा ठरला आहे.
रोहित शर्मा हा आयपीएलच्या (Ipl 2023) इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. मुंबई इंडियन्सपेक्षा जास्त वेळा आयपीएल ट्रॉफी कोणत्याही संघाने जिंकलेली नाही. मुंबई इंडियन्सनंतर महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने 4 वेळा आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला आहे. विशेष म्हणजे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रोहित शर्माने 2013 साली पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएल 2015, आयपीएल 2017, आयपीएल 2019 आणि आयपीएल 2020 जिंकले.
तर दुसरीकडे आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा मोठा दावेदार आहे. सुर्याने आयपीएलमध्ये 62 सामने खेळले आणि 59 डावात 1575 धावा केल्या. सूर्यकुमारची आयपीएलमधील सर्वोच धावसंख्या 82 धावा असून त्याच्याकडे आयपीएलमध्ये 10 अर्धशतक केले.