ZOMATO डिलीव्हरी बॉय चिमुकलीला घेऊन पार्सल द्यायला दारात आला अन् मग...हा VIDEO तुम्ही पाहिला का?

Zomato Delivery Boy : पावसाळ्यात मस्त घर बसल्या हॉटेलमधील पदार्थांच्या आस्वाद घ्यायचा असेल तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो ZOMATO डिलीव्हरी बॉय. सोशल मीडियावर चिमुकलीला घेऊन पार्सल द्यायला तो आला आणि मग...

नेहा चौधरी | Updated: Jul 10, 2023, 01:07 PM IST
ZOMATO डिलीव्हरी बॉय चिमुकलीला घेऊन पार्सल द्यायला दारात आला अन् मग...हा VIDEO तुम्ही पाहिला का?  title=
zomato delivery boy baby girl in his lap to deliver food customer video viral on Internet trending video today on google

Zomato Delivery Boy With His Daughter Viral Video : लग्न केल्यानंतर संसार हा दोघांची जबाबदारी आहे. घराला हातभार लावण्यासाठी आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला कामावर जात आहेत. तर दुसरीकडे मुलांचा सांभाळ करत नोकरी करताना महिला कायम दिसतात.  त्यांची ही तारेवरची कसरत करताना अनेक जण तिला अप्रत्यक्ष मदत करत असतात. (Viral Video)

आपण अनेक वेळा सोशल मीडियावर कामाच्या ठिकाणी मुलांचा सांभाळ करत कर्तव्य बजावणारी महिला पाहिली आहे. पण तुम्ही कधी एखाद्या वडिलांना पाहिलं आहे का? काळ बदलतोय, यशस्वी पुरुषामागे एक खंबीर स्त्री उभी असते. तसंच आज एका यशस्वी स्त्रीच्या मागे खंबीर पुरुषदेखील आहे. सोशल मीडियावर अशाच एका वडिलांचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकतोय. (zomato delivery boy baby girl in his lap to deliver food customer video viral on Internet trending video today on google)

एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय (Zomato Delivery Boy video) लहान चिमुकलीला घेऊन पार्सल देण्यासाठी दारावर आला. हा व्हिडीओ इंटरनेटवर ट्रेंडिंगमध्ये आहे. या व्हिडीओमध्ये जेव्हा तो डिलिव्हरी बॉय ग्राहकाला पार्सल देण्यासाठी येतो तेव्हा ग्राहक अवाक् होऊन जातो. तो त्याला विचारतो ही मुलगी तुझी आहे का? तेवढ्यात त्याचा मागे अजून एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा तो ग्राहक विचारतो, हादेखील तुझा मुलगा आहे? या दोघांना घेऊन तू कामावर येतो. उन्हात घेऊन यांना काम करतो. हे पाहून ग्राहक आश्चर्यचकित होतो आणि त्यांचं कौतुक करतो. (trending news)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर एका फूड ब्लॉगर foodclubbysaurabhpa याने आपल्या पेजवर पोस्ट केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. हा व्हिडीओ प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. या व्यक्ती दोन मुलांचा सांभाळ करत दिवसभर आपलं कामं प्रामाणिकपणे करतो. 

या व्यक्तीचं सोशल मीडियावर खूप प्रशंसा होते आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 1 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शिवाय या डिलिव्हरी बॉयला मदतीसाठीही अनेक हात पुढे आले आहेत. परिस्थिती कशीही असो पण परिश्रम करण्यासाठी जिद्द असेल आणि सोबत प्रामाणिकपणा असेल तर जग सहज जिंकता येतं.