Video : स्वत:वर ऑपरेशन करणारा मासा, हा मासा कसा करतो स्वत:वर उपचार?

स्वत:वर ऑपरेशन करणारा मासा. स्वत:वर ऑपरेशन करणारा मासा, हा मासा कसा करतो स्वत:वर उपचार? झेब्राफिश करतो मृत्यूवर मात?

Updated: Nov 15, 2022, 11:26 PM IST
Video : स्वत:वर ऑपरेशन करणारा मासा, हा मासा कसा करतो स्वत:वर उपचार? title=

सागर आव्हाड, झी २४तास, पुणे : Fish That Developes Own  Body Parts : माणसाचा मेंदू, ह्रदय बंद झालं की माणूस मरतो पण जगात एक असा मासा आहे की त्याचा एखादा अवयव बंद पडला, त्याला शरिरात कुठे इजा झाली..तर तो मासा स्वतच स्वतचे अवयव दुरुस्त करतो. हा मासा आहे झेब्राफिश. स्वतावर उपचार करण्याच्या या माशाच्या वैशिष्ट्यामुळे त्याच्यावर पुण्यात संशोधन सुरु आहे. मनुष्यप्राणी आणि झेब्राफिशचे अवयव सारखेच असतात. माणसाचा विकासही झेब्राफिशप्रमाणेच असतो. त्यामुळेच झेब्राफिशवरील संशोधनामुळे मानवाला पुनर्जन्म मिळू शकतो का यावर संशोधन सुरु आहे.. झेब्राफिशचे पुनरुत्पादन कसे होते आणि या प्रक्रियेत कोणते घटक  आहेत? झेब्राफिशवरील संशोधनातून मिळालेलं ज्ञान आपण पुनर्जन्म मिळविण्यासाठी वापरू शकतो का? यावर आता संशोधन केलं जातंय.

याबाबत संशोधक काय म्हणतात? पाहा खालील व्हिडीओ 

याबाबतचा संपूर्ण रिपोर्ट पाहा, पाहा खालील व्हिडीओ