मुंबई : सोशल मीडियावर इन्स्टाग्राम रील्सचा ट्रेंड झपाट्यानं वाढला आहे. 'टिक-टॉक' प्रमाणेच या प्लॅटफॉर्मवरील लोक चित्रपटातील गाण्यांवर काही सेकंदांचा व्हिडिओही बनवतात. या क्लिपमध्ये, तुम्ही लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी हे व्हिडीओ शूट करताना दिसतात. काही लोक लाइक्स आणि व्ह्यूजच्या शर्यतीत आपला जीव धोक्यात घालण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेल्वे ट्रॅकवर एक तरुण इन्स्टाग्राम रील व्हिडीओ शेअर करायला गेला आणि सगळं काही बदललं. (Train Accident Viral Video)
रिपोर्टनुसार, ही घटना 4 सप्टेंबर रोजी तेलंगणातील काझीपेट येथे घडली. येथे एका तरुणानं मागून ट्रेन येत असल्याचं पाहताच रील व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्या मुलाच्या मित्रानं हा व्हिडीओ शूट केला होता. (Instagram Reel Video)
या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्या तरूणाला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे. उपचार सुरू आहेत. हा तरुण 17 वर्षीय असून अक्षय राज असे त्याचे नाव आहे. तो वडेपल्ली येथील महाविद्यालयात फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे. अक्षय त्याच्या मित्रासोबत 'इन्स्टाग्राम रील' बनवण्यासाठी रेल्वे ट्रॅकजवळ आल्याचे सांगण्यात आले. (Youth Hit By Train In Kazipet As Instagram Reel Shoot Near Railway Tracks Goes Wrong In Telangana Watch The Video )
आणखी वाचा : 'बाहुबली'साठी एस.एस.राजमौलींनी 'या' हॉलिवूड चित्रपटांचे सीन्स केले Copy? Video Viral
मित्राने व्हिडीओ शूट करायला सुरुवात करताच तो मुलगा रेल्वे रुळाजवळ जाऊ लागला. तर मागून जोरात रेल्वेवरून जोरात धावत ट्रेन आली. मात्र हे तरुणाच्या लक्षात आलं नाही. कदाचित ट्रेन त्याच्या जवळून जाईल असा तो विचार करत होता. मात्र तो ट्रेनच्या इतका जवळ आला की त्याचा अपघात झाला. (Reel Video Accident)