Cyrus Mistry यांच्या पत्नी आहेत मोठ्या Corporate हस्ती, जाणून घ्या कोण आहेत रोहिका छागला?

सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का, पाहा कोण-कोण आहेत त्यांच्या कुटुंबात 

Updated: Sep 5, 2022, 06:25 PM IST
Cyrus Mistry यांच्या पत्नी आहेत मोठ्या Corporate हस्ती, जाणून घ्या कोण आहेत रोहिका छागला? title=

Cyrus Mistry Accident : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष (tata sons former chairman) सायरस मिस्त्री (54) यांचा कार अपघातात मृत्यू (Cyrus Mistry death) झाला. त्यांच्या मृत्यूने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे. अहमदाबादहून मुंबईकडे येत असताना त्यांची कार पालघरनजीक (Palghar) एका पुलावर डिव्हायडरला धडकली. यात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला.

सायरस मिस्त्री यांच्या पश्चात त्यांची पत्नी रोहिका (Rohiqa Chagla), दोन मुलं जहान (Zahan Mistry) आणि फिरोज मिस्त्री (Firoz Mistry) असं कुटुंब आहे. रोहिका छागला यांनी सायरस मिस्त्री यांना नेहमीच खंबीर साथ दिली. टाटा समुहाशी झालेल्या गंभीर वादातही रोहिका सायरस मिस्त्री यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या.

कोण आहेत रोहिका छागला?
रोहिका छागला स्वतः कॉर्पोरेट आयकॉन (Corporate Icon) आहेत. काही खाजगी पब्लिक लिमिटेड कंपन्यांमध्ये त्यांनी संचालकपदही भूषवलं आहे. रोहिका छागला यांच्या वडिलांचं नावं बॅरिस्टर इक्बाल छागला (barrister Iqbal Chagla) असं आहे. रोहिका यांचे आजोबा मोहम्मद करीम छागला (MC Chagla) हे एक न्यायशास्त्रज्ञ तसंच माजी कॅबिनेट मंत्री होते. पाकिस्तानचे प्रसिद्ध वकील मोहम्मद अली जिना यांचे ते ज्युनिअर होते. जिन्ना यांना एमसी छागला यांच्या कायदेशीर प्रतिभेवर प्रचंड विश्वास होता. एमसी छागला हे मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करायचे.

टाटा आणि मिस्त्रि यांच्या बोर्डरुम वादात रोहिकाचं कुटुंब कायदेशीररित्या सामील होतं.  2012 मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2016 मध्ये मिस्त्री आण टाटा या भारतातील दोन सर्वात प्रतिष्ठित कॉर्पोरेट कुटुंबांमध्ये संघर्षाला सुरुवात झाली. सायरस मिस्त्री हे टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष होते. 2012 मध्ये रतन टाटा यांनी सेवानिवृत्ती जाहीर केल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती.