Youth died while playing garba: दोन वर्षांनी कोरोनाच्या महासंकटानंतर देशभरात मोठ्या उत्साहात नवरात्री (Navratri 2022) साजरा करण्यात येतं आहे. निर्बंधाशिवाय यंदा गरबा खेळण्याचा आनंद तरुणाई घेताना दिसतं आहे. जर तुम्ही गरबा खेळत असाल तर जरा जपून. कारण एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मुंबईतील (Mumbai) मुलुंडमध्ये (Mulund) शनिवारी 1 ऑक्टोबरला गरबा (Garba) खेळताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. ऋषभ लहरी मंगे भानुशाली (Rishabh Lahari Mange Bhanushali) असं मृत 27 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो डोंबिवलीचा (Dombivli) रहिवासी होता. तर वाशिमध्ये दोन तरुणांचा उत्साहाच्या भरात करुण अंत झालं आहे. या घटना ताज्या असताना अजून एक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतो ज्यामध्ये एक तरुण गरबा खेळताना अचानक कोसळला. या तरुणाला नेमकं काय झालं आणि ही घटना कुठली आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. (young man dies while playing garba shocking video nmp)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ हा गुजरातच्या (Gujarat) आणंद जिल्ह्यातील आहे. विरेंद्र सिंह (Virendra Singh) असं या तरुणाचं नाव असून 21 वर्षीय या तरुणला गरबा खेळत असताना हृदय विकाराचा (heart attack) झटका आला.
तारापूरमधील शिव शक्ती सोसायटीत नवरात्रीनिमित्त गरब्याचं आयोजन करण्यात येतं. इथे हा तरुण गरबा खेळायला गेला होता. आजकाल तरुण पिढी प्रत्येक क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करत असतात. त्यामुळे विरेंद्र सिंह हा तरुण गरबा खेळत असताना अचानक कोसळला आणि ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली.
तरुणाला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याचा हृदय विकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
नवरात्रोत्सवाचा आनंद घेता यावा म्हणून शिंदे सरकारने (Shinde Govt) मोठा निर्णय घेतला. तीन दिवस रात्री 12 पर्यंत गरबा खेळत खेळता येईल असं सरकारने जाहीर केलं. शनिवार (Saturday), सोमवार (monday) आणि मंगळवार (tuesday) या तीन दिवशी अनेकांना गरबा खेळण्याचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे आज आणि उद्या खेळायला जाणार असाल तर काळजी घ्या.