तिरुवनंतपुरम : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे जो, सगळ्यांनाच विचार करायला लावणारा आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका भीक मागून पोटभरणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंच्या संख्येने जमलेल्या लोकांचा आहे. एका भिक मागणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी जी गर्दी झाली आहे. ती पाहून लोकं विचारात पडले आहेत.
बसवा उर्फ हुच्चा बस्या भीक मागून आपला गुजारा करायचे. त्यांचा गेल्या आठवड्यात शुक्रवारी अपघात झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांनी उपचारांना प्रतिसात न देता शनिवारी आपले प्राण सोडले. मात्र, त्यांच्या अंत्ययात्रेसाठी त्यांच्याशी अनोखं नातं जोडलं गेलेल्या लोकांनी मोठी गर्दी केली होती.
या व्हिडीओमध्ये इतकी जास्त गर्दी पाहून तुम्हाला वाटेल की, एखाद्या सेलिब्रिटी किंवा मोठ्या व्यक्तीची अंत्ययात्रा असावी, परंतु तसे नाही. हुच्चा बस्या आयुष्यभर भीक मागून दिवस काढत होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोकांची गर्दी झाली.
बसवा हे कर्नाटकातील हदगली परिसरात भीक मागायचे, परंतु ते त्या गावातल्या रहिवाशांसाठी गुडलक होते. बसवा लोकांकडून अवघा एक रुपया भीक घेत होते. विशेष म्हणजे लोकांनी जास्त त्यांना दिले किंवा आग्रह केला, तरी देखील ते फक्त त्यांच्याकडून 1 रुपयाच घ्यायचे आणि उरलेले पैसे परत करायचे.
Unbelievable!!
This is not a death of any VIP. People of Hadagali town in #Karnataka turned in thousands to bid adieu to a mentally challenged beggar #hadagalibasya . @indiatvnews @IndiaTVHindi pic.twitter.com/Jc0kbN4KSp— T Raghavan (@NewsRaghav) November 16, 2021
लोकांनी बसवा यांना एक रुपया दिल्यानंतर काहीतरी चांगलं घडतं, अशी लोकांची श्रद्धा होती. यामुळे बसवा या भागात बरेच प्रसिद्ध देखील झाले होते, असं आयएएनएसच्या अहवालात म्हटलं आहे आणि यामुळेच त्यांच्या अंत्ययात्रे वेळी लोकींनी हजारोंच्या संख्येनं गर्दी केली होती.