18 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर निर्ल्लज्ज मौलवी तिला म्हणतो,''तू...''

या मदरशाची तुलना तुरुंगाशी करताना महिलेने सांगितलं...

Updated: Nov 18, 2021, 06:43 PM IST
18 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर निर्ल्लज्ज मौलवी तिला म्हणतो,''तू...'' title=

केरळ : केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणीने मदरशाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. त्या तरुणीने दिलेली बातमी ही मदरशावर आणि त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे. या तरुणीने मदरशाच्या प्रमुखावर महिला आणि मुलींना इस्लाम शिकवण्याच्या बहाण्याने छळ आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. एका टीव्ही चॅनेलला मुलाखत देताना तरुणी म्हणाली की, इस्लामिक सेमिनरीच्या प्रमुखाकडून मुलींचे लौंगिक शोषण केले जात आहे.

या मदरशाची तुलना तुरुंगाशी करताना महिलेने सांगितले की, महिला आणि मुलींना धार्मिक मदरशातून बाहेर पडण्यास मनाई आहे. जसे की, त्यांना जेलमध्येच ठेवले आहे. अशी वागणूक त्यांना मिळते.

तरुणीच्या म्हणण्यानुसार, मदरशाचे प्रमुख असलेल्या एका मुस्लिम धर्मगुरूने एका दिवशी 18-19 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. यानंतर मुलींना दिशाभूल करत सांगण्यात आले की, अंघोळ केल्यावर तिचे सर्व पाप माफ होतील.

तिला या घटनेची माहिती कशी मिळाली याबद्दल सांगताना तरुणीने सांगितले की, पीडितेने तिच्यासोबत घडलेला प्रकार तिला सांगितला होता.

तरुणीने त्या मुलीचा किस्सा सांगताना मुलाखतीत सांगितले, कसं मुस्लिम धर्मगुरूंनी धार्मिक केंद्रात सामील होण्यासाठी असुरक्षित महिला आणि मुलींना टार्गेट केलं आणि नंतर त्यांच्यावर असह्य अत्याचार केले आहेत. स्त्रिया आणि मुलींना त्यांच्या खर्चासाठी निवास आणि पैसे देण्याच्या बहाण्याने मदरशांमध्ये सामील करून त्यांची दिशाभूल करण्यात आली आहे.

तरुणीने सांगितले की, त्या मदरशामध्ये मुलींना 40 दिवसासाठी राहण्यास सांगितले गेला होते. यावेळात मदरशाचा प्रमुख प्रत्येकासोबत वैयक्तिकरित्या वेळ घालवायचा. यावरुन मौलवीने मुलींच्या खोलीत जाऊन त्यांचा छळ केला आणि लैंगिक अत्याचार केल्याचा खुलासा महिलेने केला आहे.

19 वर्षीय मुलीसोबत घडलेल्या लैंगिक अत्याचाराबाबत बोलताना महिलेने सांगितले की, ही घटना 8 जून रोजी घडली होती, परंतु मुलीने ही घटना पोलिसात सांगितली तरी देखील पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही.