नवी दिल्ली : देशभरात कोरोनाविरोधात लढाई सुरु आहे. सध्या कोरोना पॉझिटीव्ह्सचे आकडे कमी होताना दिसत नाहीयत. यादरम्यान एक महत्वाची बातमी समोर येतेयं. तुम्ही कोरोना पॉझिटीव्ह असाल तर कंपनी तुम्हाला पैसे देईल अशी एक योजना समोर येतेय. लवकरच यासंदर्भातील वीमा योजना बाजारात येऊ लागल्या आहेत.
इंश्योरंस रेग्युलेटर IRDAI ने सर्व विमा कंपन्यांना कोरोनाशी संबंधित फिक्स बेनिफिट कोविड योजना आणण्याच्या सूचना केल्या आहेत. ३० जूनपर्यंत सर्व योजना सुरु करण्यास सांगण्यात आलंय. यानुसार कोणीही कोरोना पॉझिटीव्ह असल्यास त्याला ठराविक रक्कम वीमा कंपन्यांना द्यावी लागणार आहे.
यासाठी वीमा प्रिमियम ठरवण्याचा निर्णय कंपन्यांवर सोडण्यात आलाय. ग्राहकांना ५० हजारांपासून ५ कोटींपर्यंत सम इश्योर्ड प्रोडक्ट मिळू शकतो. कोरोना संक्रमण पाहता १५ दिवसांचा अवधी कंपन्यांना देण्यात आलायं.
कोरोनाचं संकट पाहता सध्याच्या वीमा पॉलिसीवरील आरोग्य वीम्याचा प्रिमियम २० टक्क्यांनी वाढवण्यात आलाय. टर्म इंश्योरन्समध्येही कंपनियांनी प्रिमियम राशी वाढवली आहे. दरवर्षी १० हजार वीमा करणाऱ्या व्यक्तींपैकी ३ जणांचा मृत्यू होतो असे वीमा कंपन्या गृहीत धरतात. पण गेल्या महिन्यात ही सरासरी बदलली आहे. अचानक वाढलेल्या या मृत्यूदरामुळे वीमा कंपन्यांना मोठा झटका बसलाय.