भारत-चीन वादावर मायावती यांचा विरोधी पक्षाला हा सल्ला

चीनसोबत सुरु असलेल्या वादावर  मायावतींची प्रतिक्रिया

Updated: Jun 22, 2020, 05:48 PM IST
भारत-चीन वादावर मायावती यांचा विरोधी पक्षाला हा सल्ला title=

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती (Mayawati) यांनी चीनसोबत सुरु असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकार आणि विरोधी पक्षाला एकजूट राहण्याचे तसेच देशहित आणि सीमेच्या रक्षणाचं काम सरकारवर सोडून द्यावं असं म्हटलं आहे.

मायावती यांनी सोमवारी ट्विट करत म्हटलं की, 'काही दिवसांपूर्वी 15 जूनला लडाखमध्ये चीनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षात कर्नल यांच्यासह २० जवांनाच्या हुतात्म्यावर संपूर्ण देश दु:खी, चिंतेत आणि संतापात आहे. त्यामुळे सरकार आणि विरोधी पक्षाने परिपक्वता आणि एकजुटतेने काम केलं पाहिजे. जे देश-जगाला दिसेल आणि प्रभावी सिद्ध होईल.'

मायावतींनी एका ट्विट मध्ये असं म्हटलं की, 'अशा कठीण आणि आव्हानात्मक काळात भारत सरकारच्या पुढच्या कारवाईबाबत लोकांमध्ये आणि तज्ज्ञामध्ये वेगवेगळी मते असू शकतात. पण ते सरकारवर सोडलं पाहिजे. ते देश आणि सीमेचं रक्षण प्रत्येक प्रंसगात करतील. जे प्रत्येक सरकारचं कर्तव्य आहे.'